Big Boss Marathi (फोटो सौजन्य-Instagram)
‘बिग बॉस मराठी ५’ चा नवा पर्वाचा ग्रँड प्रीमियर मोठ्या थाटामाटात पार पडताना दिसला आहे. तसेच यावेळी अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालनचे काम हाताळताना दिसला. होस्ट म्हणून रितेश पहिल्यांदाच चाहत्यांना दिसणार आहे. यानंतर हा ‘बिग बॉस मराठी ५’ अनेक वेगवेगळे सोळा स्पर्धकांची या घरामध्ये एंट्री झाली आणि प्रेक्षकांचा जीव भांड्यात पडला कारण या भागात नक्की कोणकोणते अनोखे चेहरे पाहायला मिळणार आहेत याची आतुरता सगळ्यांनाच होती. तसेच या शो मध्ये अनेक मराठी कलाकारदेखील पाहायला मिळालेले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकर, अभिनेत्री निक्की तंबोळी, गायक अभिजीत सावंत आणि इतर स्पर्धकांचा समावेश आहे. आज पासून बिग बॉसचे स्पर्धक घरात एकत्र दिसत आहे. पण पहिल्याच दिवशी निक्की आणि वर्षा उकसगावर यांच्यामध्ये जोरदार भांडण होताना दिसले आहे.
नक्की काय घडले?
‘बिग बॉस मराठी ५’ या रिअॅलिटी शो आज सकाळ पासून चांगलाच आणि दमदार सुरुवात झाली आहे. या शोमध्ये सकाळी सगळे स्पर्धक एकदम आनंदात आणि उत्साहात उठताना दिसले आहेत. पण काही वेळातच घरातील पाणी नसल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर बिग बॉसने स्पर्धकांना एकत्र लिविंग रुममध्ये जमा होण्याचा आदेश दिला.सगळेजण लिविंग रुममध्ये एकत्र आले आणि त्यानंतर वर्षा उसगावकर या मेकअप करत बसल्या असताना त्यांचा मेकअप सुरुच होता. परंतु सर्व स्पर्धक बिग बॉसचा आदेश एकूण सोफ्यावर येऊन बसतात. पण वर्षा मात्र कोणाचेही ऐकायला तयार नव्हती आणि यानंतर या घरात पहिल्याच दिवशी वाद निर्माण होताना दिसले.
याचदरम्यान, निक्की तंबोळी त्यांना बोलवायला जाते. तेव्हा वर्षा तिच्यावर चिडतात आणि म्हणतात की, ‘तू मेकअप करुन, आवरुन बसली आहेस. मी अशीच नाही येऊ शकत. मला पण आवरु द्या’ असे बोलून ती तिच्यावर भडकते. ते ऐकून निक्की तेथून निघून जाते. निक्की सगळ्यांना जाऊन सांगते. सर्वजण त्यांच्यावर चिडतात. आता वर्षा उसगावकर सगळ्या स्पर्धकांशी याविषयावरुन भांडणार की शांत बसणार हे नंतरला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
बिग बॉसच्या घरातील गेले पाणी
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनच्या पहिल्या एपिसोडचा पहिला प्रोमो नुकताच आऊट झालाय. आणि तो प्रेक्षकांना भरपूर आवडला प्रोमोमध्ये पहिल्याच दिवशी घरात पाणी येत नसल्याने सदस्यांची अडचण झालेली पाहायला मिळाली आहे. बिग बॉस’मधील सगळे स्पर्धक बिग बॉस याना पाणी सोडण्यास विनंती करताना दिसले आहेत. पाणी अत्यावश्यक बाब असल्यामुळे स्पर्धक थोडे हतबल होताना या भागात दिसले आहेत. त्यांना विनंती करताना पाहून बिग बॉस म्हणतात,”आता फक्त घरातलं पाणी गेलंय…थोड्याच वेळात आपल्या सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळेल”. त्यामुळे पहिल्याच दिवशी स्पर्धकांना मोठा धक्का बसला आहे.