चेहऱ्यावर वाढलेला काळपटपणा- काळेडाग होतील कायमचे नष्ट! १ चमचा मुलतानी मातीचा 'या' पद्धतीने करा वापर
भारतीय सौंदर्य प्रसाधनांमध्ये पिढ्यानुपिढ्या मुलतानी मातीचा वापर केला जातो. मुलतानी माती त्वचेसाठी खूप जास्त प्रभावी आहे. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा खूप जास्त कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करावे लागतात. कारण थंडीमध्ये त्वचेमधील ओलावा कमी होऊन जातो. यामुळे त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर काळेडाग, त्वचा पांढरी दिसणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. बऱ्याचदा त्वचा ग्लोइंग दिसण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअरचा वापर केला जातो. कधी फेशिअल केले जाते तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअरचा वापर करून त्वचेची काळजी घेतली जाते. याशिवाय बाजारात अनेक वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. मात्र वारंवार स्किन ट्रीटमेंट केल्यामुळे त्वचा खूप जास्त सैल होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चमचाभर मुलतानी मातीचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. पूर्वीच्या काळापासून मुलतानी मातीचा वापर केला जातो. (फोटो सौजन्य – istock)
अशा प्रकारे चेहऱ्यावर लावा हळद! चेहऱ्यावरचे डाग धब्बे दूर जातील पळत
मुलतानी माती त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे. वाटीमध्ये एक चमचा मुलतानी माती घेऊन त्यात गुलाब पाणी घालून मिक्स करून घ्या. याशिवाय कोरडी त्वचा असलेल्यांनी दही किंवा दुधात मुलतानी माती मिक्स करून घ्यावी. मुलतानी मातीच्या वापरामुळे त्वचा मऊ होऊन जाते. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. १५ ते २० मिनिट ठेवून नंतर थंड पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचेवर वाढलेला टॅनिंग आणि काळेडाग घालवण्यासाठी मदत होते. मुलतानी मातीच्या वापरामुळे डोळ्यांभोवती वाढलेला काळेपणा कमी होण्यास मदत होते.
त्वचेवर वाढलेले टॅनिंग किंवा पिगमेंटेशन घालवण्यासाठी कोणत्याही केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी नैसर्गिक आणि घरगुती पदार्थांचा वापर करावा. मुलतानी मातीमध्ये मॅग्नेशियम क्लोराईड युक्त घटक आढळून येतात, ज्यामुळे चेहऱ्यावर वाढलेला टॅन आणि त्वचेवर जमा होणारे अतिरिक्त तेल कमी होऊन जाते. तेलकट त्वचा असलेल्या महिलांनी मुलतानी मातीमध्ये गुलाब पाणी मिक्स करून लावावे. चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स, मुरुम, पिगमेंटेशन कमी करण्यासाठी मुलतानी मातीचा वापर करावा.
त्वचेसाठी वरदान, खोबरेल तेल दूर करेल चेहऱ्यावरील सुरकुत्या; वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
त्वचेवर वाढलेले पिंपल्स आणि ऍक्ने कमी करण्यासाठी मुलतानी मातीचा वापर करावा. यामध्ये असलेले घटक त्वचा आतून स्वच्छ करतात. याशिवाय नाकावर वाढलेले ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स कमी करण्यासाठी मदत करतात. चेहऱ्यावरील टॅनिंग घालवण्यासाठी वाटीमध्ये गुलाबी पाणी आणि मुलतानी माती एकत्र मिक्स करून त्वचेवर लावावी. आठवडाभरात त्वचा अतिशय चमकदार आणि सुंदर दिसेल. त्वचेवरील रक्तभिसरण सुधारण्यासाठी मुलतानी मातीचा वापर करावा.






