राज्यातील 29 महापालिका निवडणुकांची आज घोषणा होण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले असून, आज घोषणा झाल्यास राज्यात तत्काळ आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयोगाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.
महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यातील 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त गेल्याने पुन्हा आरक्षण सोडत होण्याची शक्यता आहे. (Election Commission of India )
या आरक्षणावर 21 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, त्यानंतरच निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे. खात्रीलायक सूत्रांनुसार, जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकीचे मतदान होण्याची शक्यता आहे.
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांची दहशत! कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर थेट हल्ला, थेट कॉलर पकडली
राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी खालील 29 महानगरपालिकांचा समावेश आहे—
अहिल्यानगर, अकोला, अमरावती, भिवंडी-निजामपूर, बृहन्मुंबई, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, इचलकरंजी, जळगाव, जालना, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, लातूर, मालेगाव, मीरा-भाईंदर, नागपूर, नांदेड-वाघाळा, नाशिक, नवी मुंबई, पनवेल, परभणी, पिंपरी-चिंचवड, पुणे, सांगली-मिरज-कुपवाड, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर आणि वसई-विरार.
पंतप्रधान मोदी आजपासून परदेश दौऱ्यावर ; द्विपक्षीय भागीदारीसाठी ‘या’ देशांना देणार भेट
राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याचे नियोजन केले आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका 15 ते 20 जानेवारी 2026 दरम्यान पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी नोव्हेंबरमध्ये, तर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी डिसेंबरमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे निवडणुका काहीशा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घेण्याची मुदत दिली असून, त्याआधीच महापालिका निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे.
महापालिका: 29
नगरपालिका: 246
नगरपंचायती: 42
जिल्हा परिषद: 32
पंचायत समिती: 336






