• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Asambhav To Premiere At The International Film Festival Of India On 21st November

मराठी रंगभूमीचा जादूगर कपिल भोपटकर, ‘असंभव’ चित्रपटाने चर्चेत, ‘या’ तारखेला IFFI मध्ये होणार प्रदर्शित

'असंभव' या चित्रपटाची कथा, पटकथा कपिल भोपटकर यांनी लिहिली असून येत्या २१ नोव्हेंबर रोजी 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया' मध्ये प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 15, 2025 | 02:15 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मराठी रंगभूमी आणि टेलिव्हिजन जगतात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे लेखक-दिग्दर्शक कपिल भोपटकर आता त्यांच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘असंभव’ हा चित्रपटामुळे चर्चेत आहेत. मराठी रंगभूमी आणि टेलिव्हिजन क्षेत्रात गेली तीन दशके आपल्या लेखणीतून आणि कल्पनाशक्तीतून त्यांनी एक वेगळा ठसा उमटवला आहे.

१९९०च्या दशकात पोद्दार कॉलेजमध्ये विद्यार्थी असताना त्यांनी सात एकांकिका लिहिल्या, ज्यांनी आंतरकॉलेज स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार जिंकले. त्यांची पहिली एकांकिका ‘जल्लोष’ आता ‘झेप’ या पटकथेत रूपांतरित होत असून लवकरच ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कपिल यांचा व्यावसायिक प्रवास प्रसिद्ध पटकथाकार सब्यसाची देब बर्मन यांच्या ‘शांती’ या मालिकेसाठी सहाय्यक संवाद लेखक म्हणून सुरु झाला. १९९८ मध्ये कपिल त्यांनी विश्राम बेडेकर यांच्या साहित्याचा मानदंड ठरलेल्या ‘रणांगण’ या प्रसिद्ध मराठी कादंबरीचं रंगमंचीय रूपांतर केलं आणि पुढे या नाटकाने अनेक प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले. रिचर्ड बाक यांच्या ‘जोनाथन लिविंगस्टोन सिगल’ या पुस्तकाचं मराठी नाट्य रूपांतर दिग्दर्शित केलं आणि १९९९ मध्ये मानाची ‘सवाई ट्रॉफी’ जिंकली. या प्रयोगातून प्रियदर्शन जाधव, जितेंद्र जोशी, मधुरा वेलणकर आणि सिद्धार्थ जाधव यांसारख्या आजच्या लोकप्रिय कलाकारांचा प्रवास सुरु झाला.

Bigg Boss 19 : खरं की काय? कुनिका सदानंद मालती चहरला म्हणाली ‘लेस्बियन’ तान्या मित्तलला सांगितली की, “मला खात्री आहे…”

टेलिव्हिजन विश्वात त्यांनी ‘सनसनी’ या मानसशास्त्रीय थ्रिलर मालिकेपासून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. अल्फा मराठीवरील ‘आक्रीत’ मालिका, त्यात संदीप कुलकर्णी, सयाजी शिंदे, अतिषा नाईक अशा मातब्बर कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या, त्या मालिकेचे लेखन केले, ज्याला नामांकन मिळाले होते. त्यानंतर श्रावणसरी, कगार आणि थरार अशा मालिकांमधून लेखन आणि पटकथेत नवे प्रयोग केले. विशेष म्हणजे त्यांनी दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या ‘माझा खेळ मांडू दे’ या नाटकाचं पटकथेत रूपांतर करून ‘रैन बसेरा’ ही टेलिफिल्म लिहिली, ज्यात किरण खेर मुख्य भूमिकेत झळकल्या. तर २०२५ मध्ये झी फायवर प्रदर्शित झालेली मराठीतील पहिली वेबसीरिज ‘अंधारमाया’ याची पटकथाही कपिल यांनी लिहिली आहे.

‘पुरुषांनाही मासिक पाळी…’ रश्मिका मंदान्नाचे विधान वादात; स्पष्टीकरण देत म्हणाली…

कपिल भोपटकर यांच्या लेखनातून वास्तव, भावना आणि मानवी नात्यांचं सूक्ष्म चित्रण नेहमीच जाणवते. ते केवळ लेखक किंवा दिग्दर्शक नाहीत तर कथा सांगण्यात, पात्रांना जीवंत करण्यात आणि प्रत्येक फ्रेममध्ये भावनिक गुंतवणूक निर्माण करण्यात पारंगत आहेत. त्यांच्या हातून आलेली प्रत्येक कथा, पटकथा प्रेक्षकांना फक्त मनोरंजन नाही तर एक अनुभव देणारी असते.’असंभव’ या चित्रपटाची कथा, पटकथा कपिल भोपटकर यांनी लिहिली असून येत्या २१ नोव्हेंबर रोजी ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया’ मध्ये प्रदर्शित होणार आहे

Web Title: Asambhav to premiere at the international film festival of india on 21st november

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 02:15 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

आई-लेकामधील हळुवार नात्याची गोष्ट ‘उत्तर’, सिनेमातील खास गोष्टी बद्दल अभिनय बेर्डे आणि रेणुका शहाणे काय म्हणाल्या?
1

आई-लेकामधील हळुवार नात्याची गोष्ट ‘उत्तर’, सिनेमातील खास गोष्टी बद्दल अभिनय बेर्डे आणि रेणुका शहाणे काय म्हणाल्या?

महादेव- पार्वतीचा आशीर्वाद आणि सखीची साथ, विशाल- अक्षयाने बांधली प्रेमाची लग्नगाठ
2

महादेव- पार्वतीचा आशीर्वाद आणि सखीची साथ, विशाल- अक्षयाने बांधली प्रेमाची लग्नगाठ

नम्रता गायकवाड–तुषार कावळेच्या डेटिंग चर्चेला उधाण, व्हॅलेंटाईन डेनिमित्त घेऊन येणार ‘काहीतरी वेगळे’ गाणं
3

नम्रता गायकवाड–तुषार कावळेच्या डेटिंग चर्चेला उधाण, व्हॅलेंटाईन डेनिमित्त घेऊन येणार ‘काहीतरी वेगळे’ गाणं

संजय नार्वेकरांचा ‘बाबा खत्री’ च्या भूमिकेत Comeback! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चा बोनस टिझर ठरला धमाकेदार
4

संजय नार्वेकरांचा ‘बाबा खत्री’ च्या भूमिकेत Comeback! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चा बोनस टिझर ठरला धमाकेदार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Sarla Maheshwari Passed Away: दूरदर्शनचा चेहरा हरपला! पत्रकार सरला माहेश्वरी यांचे निधन; माध्यम जगतात शोककळा

Sarla Maheshwari Passed Away: दूरदर्शनचा चेहरा हरपला! पत्रकार सरला माहेश्वरी यांचे निधन; माध्यम जगतात शोककळा

Feb 12, 2026 | 07:47 PM
Navi Mumbai Crime : भंगार दुकानाच्या नावाखाली ड्रग्सचा व्यपार; पोलीसांनी केला 22 लाखांचा गांजा जप्त

Navi Mumbai Crime : भंगार दुकानाच्या नावाखाली ड्रग्सचा व्यपार; पोलीसांनी केला 22 लाखांचा गांजा जप्त

Feb 12, 2026 | 07:41 PM
IND vs NAM, T20 World Cup : “बरं होण्यासाठी वेळ…” अभिषेक शर्मा पाकविरुद्ध मैदानात उतरणार? कर्णधाराच्या विधानाने खळबळ 

IND vs NAM, T20 World Cup : “बरं होण्यासाठी वेळ…” अभिषेक शर्मा पाकविरुद्ध मैदानात उतरणार? कर्णधाराच्या विधानाने खळबळ 

Feb 12, 2026 | 07:37 PM
नवीन सॅमसंग ई-पेपर डिस्प्ले बाजारात; कागदासारखा लुक, डिजिटल कामगिरी

नवीन सॅमसंग ई-पेपर डिस्प्ले बाजारात; कागदासारखा लुक, डिजिटल कामगिरी

Feb 12, 2026 | 07:33 PM
Ishqnamaच्या पोस्टर पाहून आला प्रतिक्रियांचा तुफान, Shehnaaz Gillच्या लूकने चर्चेला उधाण!  या दिवशी होणार प्रदर्शित

Ishqnamaच्या पोस्टर पाहून आला प्रतिक्रियांचा तुफान, Shehnaaz Gillच्या लूकने चर्चेला उधाण! या दिवशी होणार प्रदर्शित

Feb 12, 2026 | 07:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.