Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी सिनेसृष्टीत अनोख्या हिरो’ची दमदार एंट्री, २२ वर्षांनी सचिन पिळगांवकर–मधुराणी गोखले पुन्हा एकत्र; चित्रपटाचे पोस्टर लॉन्च

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर “कापूसकोंडा” चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले. एकूणच, गोंडस कुत्रा हिरो, जुनी हिट जोडी आणि खास कथा यामुळे “कापूसकोंडा” हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 19, 2026 | 04:35 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

“कापूसकोंडा” या नव्या चित्रपटातून एक खास ‘हिरो’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, हा हिरो माणूस नसून एक गोंडस कुत्रा आहे. या भुभूला कोणत्याही ऑडिशनशिवाय थेट मुख्य भूमिकेत काम करण्याची संधी मिळाली आहे.या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री मधुराणी गोखले तब्बल २२ वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसणार आहेत. याआधी ही जोडी “नवरा माझा नवसाचा” या गाजलेल्या चित्रपटात झळकली होती. तसेच, मधुराणी गोखले या चित्रपटातून बर्‍याच काळानंतर कमबॅक करत आहेत.आज अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर “कापूसकोंडा” चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले. एकूणच, गोंडस कुत्रा हिरो, जुनी हिट जोडी आणि खास कथा यामुळे “कापूसकोंडा” हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.

जास्वंद एंटरटेन्मेंट्स प्रा. लि. निर्मित “कापूसकोंडा” चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांचं आहे. सचिन मोहिते, गणेश पंडित, ऋषिकेश तुरई यांनी चित्रपटाची पटकथा, संवादलेखन केलं आहे. सचिन पाटेकर यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे सुमधुर संगीत या चित्रपटाला लाभले असून चित्रपटाच्या गाण्यांना गायक अवधूत गुप्ते, पद्मनाभ गायकवाड यांचा स्वरसाज लाभला आहे. सुहास राणे यांनी ध्वनी तंत्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर व अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्यासह नवीन पिढीतील अभिनेत्री अक्षता पाडगांवकर, जान्हवी तांबट आणि अभिनेता भूषण पाटील अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण कथानकाची गरज समजून लातूर जिल्ह्यातील अंधोरी या गावी करण्यात आले आहे.

Bigg Boss Marathi 6: ग्रॅंड फिनालेच्या आधीच गेम पालटला, ‘हा’ सदस्य पैशांची बॅग घेऊन पडणार घराबाहेर? पाहा Promo

“कापूसकोंडा”चित्रपटाची कथा
हा चित्रपट एका सत्य घटनेवर प्रेरित असून त्याची कथा एका कुटुंबाभोवती आणि त्यांच्या पाळीव कुत्र्याभोवती फिरते. विशेष म्हणजे, या चित्रपटाचा खरा हिरो एक माणूस नसून एक कुत्रा आहे.कथानकात मानवी नाती, कुटुंबातील भावना आणि भावनिक संबंध यांना खूप महत्त्व दिले आहे. त्यामुळे ही गोष्ट प्रेक्षकांना सहज आपलीशी वाटणारी आणि भावनिक अनुभव देणारी आहे.या चित्रपटाला “A Family Dog Film” अशी टॅगलाईन देण्यात आली आहे.लेखक आणि दिग्दर्शक सचिन मोहिते यांनी मराठीत पहिल्यांदाच एक वेगळा प्रयोग करत “डॉगव्हर्स” (Dog Universe) तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. एकूणच, “कापूसकोंडा” हा फक्त चित्रपट नसून एक भावनिक आणि वेगळा सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर अभिनेत्री Akshaya Naik च्या नव्या प्रवासाची सुरुवात, पहिल्या वहिल्या चित्रपटाचे शूटिंग सुरू

या चित्रपटाचं कथानक हे अतिशय वेगळे आहे. इतक्या वर्षांच्या माझ्या कारकिर्दीत असे कथानक मी कधी केले नाही. माझ्या भावनानसोबत या चित्रपटाचे कथानक मिळते जुळते असल्याचे मला जाणवले. त्याचप्रमाणे या चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक सचिन मोहिते हा मला पहिल्या भेटीतच कमालीचा हुशार वाटला आणि त्याच्यावर विश्वास ठेऊन मी या चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला असे सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी सांगितले.

चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक सचिन मोहिते सरांनी चित्रपटाची कथा जेव्हा मला ऐकवली तेव्हाच मी या कथेच्या प्रेमात पडली. इतकी गोड, निरागस अशी ही कथा ऐकताना माझ्या मनाला भिडली सोबत वेगळी भूमिका करण्याची संधी मला मिळाली यासाठी मी या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. कथानक खुपच वेगळ्या धाटणीचं असुनही अगदी सहजपणे मांडलं आहे. सोबत सचिन पिळगांवकर सरांसोबत काम करण्याची मला संधी २२ वर्षांनी मिळणार होती.सचिन सरांसोबत काम करताना अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या असे अभिनेत्री मधुराणी गोखले यांनी सांगितले.

उत्तम कथानकाला तितक्याच सक्षम अभिनयाची जोड असल्यानं हा चित्रपट मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे परंतु त्यासाठी अजून प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार असून लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे, तेव्हा भेटूया कापूसकोंड्याला लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.

Web Title: Sachin pilgaonkarmadhurani gokhale come together after 22 years poster released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • marathi actress
  • marathi movie
  • sachin pilgaonkar

संबंधित बातम्या

Daryabhavani: चित्रपटाच्या यशासाठीच नाही, कलाकार-तंत्रज्ञांच्या सुखासाठीही मागितलं आशीर्वादाचं गाऱ्हाणं!
1

Daryabhavani: चित्रपटाच्या यशासाठीच नाही, कलाकार-तंत्रज्ञांच्या सुखासाठीही मागितलं आशीर्वादाचं गाऱ्हाणं!

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली
2

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत
3

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत

Bhata Marathi Movie: पिढ्यानपिढ्या दगड फोडणाऱ्या बापाचं मुलांसाठी मोठं स्वप्न; ‘भाटा’ची संवेदनशील कहाणी उलगडणार
4

Bhata Marathi Movie: पिढ्यानपिढ्या दगड फोडणाऱ्या बापाचं मुलांसाठी मोठं स्वप्न; ‘भाटा’ची संवेदनशील कहाणी उलगडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.