Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रॅपच्या तालावर घुमणार छत्रपती संभाजी महाराजांची गाथा! संगीतकार ब्रम्हाचं रॅप साँग ‘शंभू राजा’ प्रेक्षकांच्या भेटीला

छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित एक आगळावेगळा ऐतिहासिक रॅप साँग 'शंभू राजा' हे नुकतंच प्रदर्शित झालं आहे. सध्या या गाण्याने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. अल्पावधीतच हे गाणं प्रेक्षकांना आवडत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 29, 2026 | 01:21 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आगळावेगळा ऐतिहासिक रॅप साँग ‘शंभू राजा’ हे नुकतंच प्रदर्शित
  • वेगळीच भावनिक आणि शैक्षणिक छटा
  • गाण्यात अभिनेते सुनील गोडबोले महत्त्वपूर्ण भूमिका
Shambhu Raja Rap Song : छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित एक आगळावेगळा ऐतिहासिक रॅप साँग ‘शंभू राजा’ हे नुकतंच प्रदर्शित झालं आहे. सध्या या गाण्याने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. इतकंच नाहीतर अल्पावधीतच हे गाणं रसिकांच्या मनावर राज्य करत आहे. आधुनिक रॅपच्या माध्यमातून इतिहास मांडण्याचा हा अनोखा प्रयत्न मानला जात आहे.

Exclusive: ‘आई तुळजाभवानी’च्या अलौकिक विवाहाचा हा अनुभव खूपच अद्भुत – पूजा काळे

वेगळीच भावनिक आणि शैक्षणिक छटा

या गाण्याचे संगीत दिग्दर्शन ब्रम्हा यांनी केले आहे. त्यांच्या सर्जनशील दिग्दर्शनामुळे पारंपरिक इतिहास आणि आधुनिक संगीत यांचा सुंदर संगम या गाण्यांत साधला गेला आहे. विशेष म्हणजे, या रॅप साँगमध्ये लहान मुलांचा अभिनय पाहायला मिळतो, ज्यामुळे गाण्याला एक वेगळीच भावनिक आणि शैक्षणिक छटा लाभली आहे.

गाण्यात अभिनेते सुनील गोडबोले यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका

या गाण्यात अभिनेते सुनील गोडबोले यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यांनी आपल्या प्रभावी अभिनयातून लहान मुलांना छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि विचारांची ओळख करून दिली आहे. त्यांच्या संवादातून मुलांना इतिहासाची प्रेरणा मिळताना दिसते. छत्रपती संभाजी महाराजांचे धैर्य, बुद्धिमत्ता आणि स्वराज्यासाठी केलेले बलिदान यांचे प्रभावी चित्रण या गाण्यात करण्यात आले आहे. रॅपच्या तालावर सादर झालेला हा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक अभिनव प्रयत्न या चिमुकल्यांनी केला आहे.

गौरवशाली इतिहासाची जाणीव करून देणारे प्रभावी माध्यम

‘ब्रम्हा ऑफिशिअल’ प्रस्तुत ‘शंभू राजा’ हे गाणं संगीत दिग्दर्शक ब्रम्हा यांचे आहे. तर या गाण्याचे बोल ब्रम्हा आणि ओंकार राज यांचे आहे. तर या गाण्याच्या व्हिडीओचे दिग्दर्शन मनीष महाजन यांचे आहे. अभिनेते सुनील गोडबोले आणि बालकलाकार अद्विका सातपुते यांच्या मुख्य भूमिका गाण्यात पाहायला मिळत आहेत. एकूणच, हे ऐतिहासिक रॅप साँग केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून, नव्या पिढीला आपल्या गौरवशाली इतिहासाची जाणीव करून देणारे एक प्रभावी माध्यम ठरत आहे.

Sunjay Dutt : संजय दत्तचा मोठा निर्णय! ‘सरके चुनर’ गाण्याच्या वादामुळे करणार पश्चाताप? मिळतेय कौतुकाची थाप

Web Title: Shambhu raja rap song chhatrapati sambhaji maharaj brahma official sunil godbole

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • Rap Song
  • viral Song

संबंधित बातम्या

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन
1

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?
2

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?

Global Economy : अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात भूकंप! २००७ नंतर पहिल्यांदाच यिल्ड ५ टक्क्यांवर
3

Global Economy : अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात भूकंप! २००७ नंतर पहिल्यांदाच यिल्ड ५ टक्क्यांवर

Israel Election : युद्धाच्या सावटात इस्रायलमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम; नेतन्याहूंची पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी
4

Israel Election : युद्धाच्या सावटात इस्रायलमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम; नेतन्याहूंची पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.