फोटो सौजन्य - Social Media
या सुनावणीचे नेतृत्व NCW अध्यक्षा Vijaya Rahatkar यांनी केले. त्यांनी विचारले की, अशा प्रकारच्या कंटेंटमध्ये सहभागी होण्यापूर्वी योग्य तपासणी आणि जबाबदारीची जाणीव ठेवली का? सार्वजनिक व्यक्ती म्हणून समाजावर प्रभाव टाकणाऱ्या कलाकारांनी कायदेशीर नियम आणि सामाजिक मूल्यांचा सन्मान राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
या प्रकरणात सुधारात्मक पाऊल म्हणून संजय दत्त यांनी ५० आदिवासी मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे आश्वासन दिले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे NCW ने स्पष्ट केले. तसेच, भविष्यातील चित्रपट प्रकल्पांसाठी करार करताना कायदेशीर तपासणी (legal due diligence) अनिवार्य करण्याचेही संजय दत्त यांनी आश्वासन दिले. यामुळे चित्रपट आणि इतर सर्जनशील प्रकल्पांमध्ये महिला व मुलांचे सन्मानपूर्वक आणि योग्य चित्रण होईल, याकडे विशेष लक्ष दिले जाईल. एकूणच, या घटनेमुळे चित्रपटसृष्टीतील कंटेंट निर्मिती, जबाबदारी आणि सामाजिक संवेदनशीलता या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
‘या’ सिनेमात झळकणार संजय दत्त
अभिनेता संजय दत्त मराठी सिनेमात झळकणार आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटात संजय दत्त दिसून येणार आहे. या सिनेमात त्याने अफजल खानाची भूमिका केली आहे.






