Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’, ‘रुबाब’ची स्टायलिश प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर; चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

झी स्टुडिओज प्रेक्षकांसाठी एक स्टायलिश, रुबाबदार लव्हस्टोरी घेऊन येत आहे. ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे

  • By अमृता यादव
Updated On: Dec 24, 2025 | 05:47 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन विषय, वेगवेगळा आशय आणि प्रेक्षकांच्या बदलत्या आवडी लक्षात घेऊन झी स्टुडिओज सातत्याने वेगळे प्रयोग सादर करत आहे. या प्रवासात त्यांनी आता प्रेक्षकांसाठी एक स्टायलिश आणि रुबाबदार लव्हस्टोरी सादर केली आहे. आशयघन सामाजिक कथा, कौटुंबिक भावविश्व ते मनोरंजनप्रधान चित्रपटांपर्यंतचा प्रवास करत, आता झी स्टुडिओज प्रेक्षकांसाठी एक स्टायलिश, रुबाबदार लव्हस्टोरी घेऊन येत आहे. ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, पहिलीच झलक आणि ‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’ ही टॅगलाईन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

टीझरमधून समोर येणारी कथा ही एका डॅशिंग, रुबाबदार नायकाची आणि त्याच्या ड्रीम गर्लची आहे. मात्र ही केवळ गोडगुलाबी प्रेमकहाणी नसून, एक रूबाबदार प्रेमकहाणी आहे. प्रेमासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असलेला, स्वतःचे नियम स्वतः ठरवणाऱ्या या नायकाची प्रेमकहाणी सगळ्यांनाच जबरदस्त आवडेल हे नक्की. प्रेमकहाणीला डॅशिंग टच देत भावनांचा समतोल साधणारा हा चित्रपट तरुणाईला नक्कीच आवडेल.

डोळ्यावर चष्मा, केसात तेल ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री ६ वर्षात इतकी बदलली; चाहत्यांनी अभिनेत्रीच्या साधेपणाचे केले कौतुक

दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात, “ ‘रुबाब’ हा चित्रपट स्वतःचा ठाम आवाज असलेल्या तरुणाईची कथा आहे. आजच्या पिढीचे प्रेम प्रामाणिक असते मात्र त्यात एक स्वॅग असतो. तोच रुबाब आम्ही या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.”

झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जनावलेकर म्हणतात, “मराठी प्रेक्षक सतत नवीन, फ्रेश आणि स्टायलिश आशयाची अपेक्षा ठेवतात. ‘रुबाब’मध्ये एक दमदार प्रेमकहाणी आहे, जी आजच्या तरुणाईच्या अ‍ॅटिट्यूडशी जोडलेली आहे.


‘रुबाब’ हा चित्रपट मनोरंजनासोबतच तरुणाईची ऊर्जा आणि भावना मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे मांडतो. ही केवळ रोमँटिक लव्हस्टोरी नाही, तर प्रेमासाठी उभे राहाण्याची, स्वतःच्या तत्वांवर जगण्याची आणि भावनांना निर्भीडपणे व्यक्त करण्याची गोष्ट आहे.”

भाईजानसोबत दिसले Dhoni आणि AP Dhillon, जुना फोटो काही मिनिटांतच Viral; चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर निर्माते आहेत तर उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. येत्या ६ फेब्रुवारीपासून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Stylish and dashing love story rubab movie teaser released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 05:47 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

डोळ्यावर चष्मा, केसात तेल ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री ६ वर्षात इतकी बदलली; चाहत्यांनी अभिनेत्रीच्या साधेपणाचे केले कौतुक
1

डोळ्यावर चष्मा, केसात तेल ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री ६ वर्षात इतकी बदलली; चाहत्यांनी अभिनेत्रीच्या साधेपणाचे केले कौतुक

Crazy Movie: डोळे खिळवणारा सस्पेन्स! ‘क्रेझी’ 2025 मधील सर्वात दमदार हिंदी थ्रिलर चित्रपट
2

Crazy Movie: डोळे खिळवणारा सस्पेन्स! ‘क्रेझी’ 2025 मधील सर्वात दमदार हिंदी थ्रिलर चित्रपट

सुपरस्टार प्रभास घेऊन आला क्रांतिकारी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल! जगभरातील क्रिएटर्ससाठी सुवर्णसंधी
3

सुपरस्टार प्रभास घेऊन आला क्रांतिकारी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल! जगभरातील क्रिएटर्ससाठी सुवर्णसंधी

Year-End 2025:TVFची पंचायत 4 ते द बॅड्स ऑफ बॉलीवुड, ‘या’ ठरल्या सर्वात चर्चित OTT सीरिज
4

Year-End 2025:TVFची पंचायत 4 ते द बॅड्स ऑफ बॉलीवुड, ‘या’ ठरल्या सर्वात चर्चित OTT सीरिज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.