• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • The Trailer Marathi Film Avkarika Was Launched In A Unique Way

पहिल्यांदाच पथनाट्य सादर करीत अनोख्या पद्धतीने ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

पहिल्यांदाच पथनाट्य सादर करीत मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. 'अवकारीका' असे या मराठी चित्रपटाचे नाव आहे. चला या चित्रपटाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 17, 2025 | 07:44 PM
पहिल्यांदाच पथनाट्य सादर करीत अनोख्या पद्धतीने 'अवकारीका' चित्रपटाचा ट्रेलर लाँच

पहिल्यांदाच पथनाट्य सादर करीत अनोख्या पद्धतीने 'अवकारीका' चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यातून उद्‍भवणाऱ्या आरोग्यविषयक असंख्य समस्या व त्या जाणीवेची आणि त्यावरील उपायांची प्रभावी मांडणी झाली ती नाट्य सादरीकरणातून. रवींद्र नाट्यमंदिरातल्या रंगमंचावर रंगलेल्या बहारदार पथनाट्याने रसिकांची मने जिंकली. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्वच्छतेचं पथनाट्य सादर करीत पहिल्यांदाच अनोख्या पद्धतीने ‘अवकारीका’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा रंगला. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाशजी आवर्जून उपस्थित होते.

रेडबड मोशन पिक्चर या बॅनर अंतर्गत ‘अवकारीका’ हा मराठी चित्रपट येत्या १ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद भोसले यांचे आहे. चित्रपटाची निर्मिती भारत टिळेकर, अरुण जाधव यांनी केली असून सहनिर्मिती मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे, गीता सिंग यांची आहे.

‘प्रिटी लिट्ल बेबी’ फेम स्टार गायक ‘कोनी फ्रांसिस’ काळाच्या पडद्याआड!

चित्रपट मनोरंजनाचे माध्यम असले तरी त्यातून समाजप्रबोधन होणे आवश्यक असतं. देशातील सामाजिक समस्यांबाबत लोकांना जागरूक करणे हे साहित्यिक, कलाकार यांचे आद्य कर्तव्य आहे. आपल्यासमोर उभ्या ठाकणार्‍या प्रश्नांना आपणच तोंड द्यायचं आहे, हे लक्षात येऊन एका महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नाची जाणीव करून देण्यासाठी एकत्र आलेल्या ‘अवकारीका’ चित्रपटाच्या टीमच्या विलक्षण प्रयत्नांना दाद देत या चित्रपटाला अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

दिग्दर्शक अरविंद भोसले म्हणतात…

स्वच्छते बाबतच्या अनास्थेच्या प्रश्नावर फक्त हळहळण्या व्यतिरिक्त समाजात फारशी कृती घडताना कधी दिसत नाही. व्यथित करणारी समाजातील हीच गोष्ट अरविंद भोसले या सर्जनशील दिग्दर्शकाच्या मनात खोलवर रुजते आणि त्यातून एका चित्रपटाची कथा जन्म घेते स्वच्छतादूतांच्या परिस्थितीने व्यथित झालेल्या या दिग्दर्शकाच्या ‘अवकारीका’ या चित्रपटातून याचे प्रतिबिंब न उमटते तरच नवल. समाजाकडून दुर्लक्षिलेला स्वच्छता आणि स्वच्छतादूत यांचे आयुष्य हा नाजूक विषय ‘अवकारीका’ चित्रपटातून त्यांनी समाजासमोर मांडला. सफाई कामगारांच्या आयुष्यात सकारात्मक दिशेने बदल व्हावे या उद्देशाने मी हा चित्रपट आणला असून हा विचार प्रत्येकापर्यंत पोहचेल असा विश्वास दिग्दर्शक अरविंद भोसले यांनी व्यक्त केला.

‘माझी Vagina, माझी मुलगी, माझे शब्द’, रिचा चढ्ढाचा ट्रोलर्सवर थेट हल्लाबोल, ‘नॅचरल बर्थ’वर केली बोलती बंद

अभिनेता विराट मडके म्हणतात…

‘स्वच्छता हा आज एक जागतिक प्रश्न झाला आहे. वेळीच आपण आपली जबाबदारी घेतली नाही तर मोठ्या संकटाला आपल्या सामोरं जावं लागेल. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक अरविंद भोसले यांनी ही जबाबदारी घेतली मला ती महत्त्वाची वाटली’. सामाजिक भान जपण्याचा आणि एका चांगल्या प्रोजेक्टचा भाग होता आल्याचा आनंद अभिनेता विराट मडके यांनी यावेळी व्यक्त केला.

निर्माते म्हणतात…

दैनंदिन आयुष्याशी निगडीत असलेला एक अत्यंत महत्त्वाचा विषय मांडणारा, ‘अवकारीका’ हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे आम्हाला गरजेचे वाटले समाजाला एक नवा दृष्टिकोन आपल्याला देता येईल म्हणून आम्ही हा चित्रपट मोठ्या पडद्यावर घेऊन आलो आहोत. त्याला प्रेक्षकांचा नक्की सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास निर्मात्यांनी यावेळी व्यक्त केला.

चित्रपटातील कलाकार

या चित्रपटात अभिनेता विराट मडके स्वच्छता दूताच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत या चित्रपटात राहुल फलटणकर, रोहित पवार, विनोद खुरंगळे, पिया कोसुम्बकर, नितीन लोंढे, प्रफुल्ल कांबळे, स्नेहा बालपांडे तसेच बालकलाकार वैभवी कुटे, उन्नती माने, कार्तिकी बट्टे, आदि कलाकार मंडळी दिसणार आहेत.

चित्रपटाची कथा-पटकथा,संवाद,गीते अरविंद भोसले यांची आहेत. छायांकन करण तांदळे तर संकलन अथर्व मुळे यांचे आहे. सहदिग्दर्शक रेहमान पठाण तर कार्यकारी निर्माता चेतन परदेशी आहेत. संगीत श्रेयस देशपांडे यांचे असून गायक कैलास खेर, सुनिधी चौहान, ज्ञानेश्वर मेश्राम यांचे स्वर चित्रपटातील गीतांना लाभले आहेत. कलादिग्दर्शक शैलेश रणदिवे आहेत.

रेडबड मोशन पिक्चरचा अरविंद भोसले दिग्दर्शित ‘अवकारीका’ हा मराठी चित्रपट येत्या १ ऑगस्ट 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ आहे.

Web Title: The trailer marathi film avkarika was launched in a unique way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 07:44 PM

Topics:  

  • Entertainment News
  • marathi film

संबंधित बातम्या

Rise And Fall: ‘इज्जत राखणं हे आपल्या हातात आहे…त्याने मात्र’, धनश्री वर्माने केली युझवेंद्रच्या वागणुकीची पोलखोल
1

Rise And Fall: ‘इज्जत राखणं हे आपल्या हातात आहे…त्याने मात्र’, धनश्री वर्माने केली युझवेंद्रच्या वागणुकीची पोलखोल

Bigg Boss 19: तान्या मित्तलने तोडली नीलम आणि कुनिकाशी मैत्री, झिशानला म्हणाली…
2

Bigg Boss 19: तान्या मित्तलने तोडली नीलम आणि कुनिकाशी मैत्री, झिशानला म्हणाली…

नवी मुंबई पोलीस अ‍ॅक्शनमोडवर; ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल
3

नवी मुंबई पोलीस अ‍ॅक्शनमोडवर; ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल

ठरलं तर! कोटींची कमाई करणारा रजनीकांतचा Coolie ओटीटीवर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, नोट करुन घ्या तारीख
4

ठरलं तर! कोटींची कमाई करणारा रजनीकांतचा Coolie ओटीटीवर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, नोट करुन घ्या तारीख

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Navarashtra Special: पुण्यातून भुंग्याच्या नव्या प्रजातीचा शोध; ‘आकुर्डी’ असे नामकरण

Navarashtra Special: पुण्यातून भुंग्याच्या नव्या प्रजातीचा शोध; ‘आकुर्डी’ असे नामकरण

अमेरिकेच्या टॅरिफचा असा काही झाला वार! जपानचे पंतप्रधान झाले शिकार

अमेरिकेच्या टॅरिफचा असा काही झाला वार! जपानचे पंतप्रधान झाले शिकार

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; हडपसरमधील जेएसपीएम कॉलेजजवळील घटना

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; हडपसरमधील जेएसपीएम कॉलेजजवळील घटना

AFG vs HK: अफगाणिस्तानने पाडला हाँगकाँगचा फडशा, पहिल्याच मॅचमध्ये चारली धूळ

AFG vs HK: अफगाणिस्तानने पाडला हाँगकाँगचा फडशा, पहिल्याच मॅचमध्ये चारली धूळ

Asia Cup 2025: 6, 6, 6, 4…54 धावांचा पाऊस, 4 मेडन ओव्हर देणाऱ्या बॉलर्सची आशिया कपमध्ये वळली बोबडी

Asia Cup 2025: 6, 6, 6, 4…54 धावांचा पाऊस, 4 मेडन ओव्हर देणाऱ्या बॉलर्सची आशिया कपमध्ये वळली बोबडी

FII विक्री सुरूच, DII गुंतवणुकीने बाजाराला दिला आधार, IT क्षेत्रात तेजी अजूनही अनिश्चित!

FII विक्री सुरूच, DII गुंतवणुकीने बाजाराला दिला आधार, IT क्षेत्रात तेजी अजूनही अनिश्चित!

‘ई-वाहन क्रांती म्हणजे स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध मुंबईची निर्मिती..’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

‘ई-वाहन क्रांती म्हणजे स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध मुंबईची निर्मिती..’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

व्हिडिओ

पुढे बघा
खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.