नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाचा विवाहसोहळा ओटीटीवर पाहता येणार, ‘या’ प्लॅटफॉर्मने मोजले तब्बल कोट्यवधी रुपये
गेल्या अनेक दिवसांपासून नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला आपल्या लग्नामुळे चर्चेत आहे. येत्या ४ डिसेंबर २०२४ रोजी हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये दोघांनीही गुपचूप साखरपुडा उरकत चाहत्यांना सुखद धक्का दिला. गेल्या अनेक दिवसांपासून नागा चैतन्य आणि सोभिताच्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये, नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाच्या लग्नाआधीचे विधी पार पडले. जोडीचे लग्न कसे आणि कुठे होणार याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. त्याचे उत्तर चाहत्यांना व्हायरल झालेल्या लग्नत्रिकेतून मिळाले. नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाचा लग्नसोहळा चाहत्यांनाही पाहायला मिळणार आहे. पण तोही ओटीटी माध्यमावर. चाहत्यांना नागा चैतन्य आणि सोभिताचा लग्नसोहळा पार पडल्यानंतर काही दिवसांनी पाहायला मिळणार आहे.
रणवीर सिंगच्या ‘डॉन 3’ चे शूटिंग पुन्हा पुढे ढकलले? कारण ऐकून होईल संताप!
मीडिया रिपोर्टनुसार, नागा चैतन्य आणि सोभिताचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या साक्षीने हा विवाहसोहळा पार पडणार आहे. सेलिब्रिटी कपलचा हा विवाहसोहळा संपूर्णत: खासगी स्वरूपाचा असणार आहे. चाहत्यांना पापाराझींच्याही कॅमेऱ्यातून विवाहाची झलक पाहता येणार नाही. मात्र, विवाह पार पडल्यानंतर काही दिवसांनी चाहत्यांना हा विवाहसोहळा ‘नेटफ्लिक्स’वर पाहता येईल. नागा चैतन्य आणि सोभिताच्या घरी लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांचे लग्न पारंपारिक पद्धतीने होणार असून सर्व विधी एकाच दिवशी केले जाणार आहेत. सोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांच्या लग्नाचे विधी ८ तास चालणार आहेत. ४ डिसेंबर रोजी पारंपारिक तेलुगू ब्राह्मण यांच्या साक्षीने हा विवाहसोहळा पार पडेल. या कार्यक्रमाच्या सांस्कृतिक महत्त्वाचा मान राखून दोन्ही स्टार लग्नाचे सर्व विधी पारंपारिक पद्धतीने एकाच दिवशी करणार आहेत.
सोभिता आणि नागा यांच्या जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘दोन्ही कुटुंबात लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. सोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांचा विवाहसोहळा आठ तासांमध्ये पार पडणार आहे. त्यांचा विवाह पारंपारिक पद्धतीने होणार असून जुन्या परंपरेप्रमाणे लग्नविधी पार पडणार आहेत. लग्नाच्या दिवशी सोभिताने खास साडी डिझाईन करुन घेतली आहे. अभिनेत्री लग्नामध्ये सोन्याची जर असलेली कांजीवरम सिल्क साडी नेसणार आहे. सोभिता स्वत: जोरात लग्नाची तयारी करत आहे. सोभिता तिच्या लग्नाची तयारी तेलगू परंपरेप्रमाणेच करीत आहे. सोभिता लग्नात जो ड्रेस घालणार आहे तो डिझायनर ड्रेस नाही. अभिनेत्रीने एक ड्रेस निवडला आहे जो परंपरा दर्शवेल. लग्नाच्या दिवशी अभिनेत्री कांजीवरम साडी नेसणार आहे. लग्नाच्या पोशाखाव्यतिरिक्त शोभिताने पांढऱ्या रंगाची खादीची साडीही निवडली आहे. आंध्र प्रदेशातील पोंडुरू शहरात तिची निर्मिती केली आहे. शोभिता तिच्या लग्नाच्या एका खास कार्यक्रमात ही साडी नेसणार आहे. यासोबतच तिने नागा चैतन्यसाठी मॅचिंग सेटही खरेदी केला आहे.
नागा चैतन्य आणि सोभिताच्या शाही विवाहसोहळ्याचा आनंद लग्नात उपस्थित असलेल्यांसह तिच्या फॅन्सलाही घरबसल्या अनुभवता येणार आहे. ‘नेटफ्लिक्स’ने या विवाहसोहळ्याचे ओटीटी टेलिकास्ट राईट्स ५० कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. टॉलिवूड सेलिब्रिटींच्या विवाहसोहळ्यांच्या टेलिकास्ट राईट्ससाठी मोजली गेलेली आतापर्यंतचे हे सर्वाधिक रक्कम मानली जाते. नयनताराच्या लग्नावर आधारित डॉक्युमेंटरीच्या यशानंतर ‘नेटफ्लिक्स’ने हा मोठा निर्णय घेतला आहे. नागा चैतन्य आणि सोभिता यांचे भारतासह परदेशांमध्येही मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे हा विवाहसोहळा ओटीटीवर आल्यास अनेक चाहते तो पाहू शकतात, असा अंदाज बांधला जात आहे. हा नागा चैतन्य आणि सोभिताचा शाही विवाहसोहळा हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये पार पडणार आहे.