Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Neetu Chandra ना शेअर केला नॅशनल अवॉर्ड विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंगसोबत काम करण्याचा अनुभव

नीतू चंद्राने शेअर केला अभिजित वारंगसह काम करण्याचा अनुभव. आखिरी सवाल हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट असून यामध्ये संजय दत्तचीही प्रमुख भूमिका आहे. अनेक दिवसांनी नीतू चंद्रा प्रेक्षकांना दिसणार आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 25, 2026 | 02:18 PM
नीतू चंद्राचा 'आखिरी सवाल' मध्ये काम करण्याचा अनुभव

नीतू चंद्राचा 'आखिरी सवाल' मध्ये काम करण्याचा अनुभव

Follow Us
Follow Us:
  • आखिरी सवालमध्ये झळकणार नीतू चंद्रा
  • राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकासह काम करण्याचा अनुभव 
  • संजय दत्तचीही मुख्य भूमिका 
संजय दत्त यांची ‘आखिरी सवाल’ ही फिल्म हळूहळू प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत असून ती आगामी काळातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरत आहे. शानदार घोषणेनंतर हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) च्या इतिहासाची प्रभावी झलक पाहायला मिळाली. वास्तव घटनांवर आधारित हा चित्रपट एका रोचक कथानकातून खोल आणि वादग्रस्त पैलूंना स्पर्श करताना दिसतो. याशिवाय यामध्ये अनेक दिवसांनी अभिनेत्री नीतू चंद्राही दिसणार आहे. 

या चित्रपटात दमदार कलाकारांची फळी आहे, ज्यामध्ये अभिनेत्री नीतू चंद्रा यांची महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटाच्या रिलीजपूर्वी त्यांनी अशा कथेत काम करण्याबाबत आपले विचार मांडले, जी पडद्यापलीकडेही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहते. तसेच, त्यांनी संजय दत्त आणि नॅशनल अवॉर्ड विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही शेअर केला.

Aakhri Sawaal Movie: संजय दत्तचा बहुचर्चित ‘आखिरी सवाल’ शेवटच्या टप्प्यात, दिग्दर्शकांनी शेअर केली पडद्यामागची खास झलक

नीतूने व्यक्त केला अनुभव 

‘आखिरी सवाल’मध्ये काम करण्याबाबत आपला प्रामाणिक दृष्टिकोन व्यक्त करताना नीतूने सांगितले की,  “गेल्या काही वर्षांत माझा दृष्टिकोन बदलला आहे. आता मी केवळ भूमिकांच्या मागे धावत नाही, तर अशा कथांचा शोध घेते ज्या कायम तुमच्यासोबत राहतात. ‘आखिरी सवाल’ ही तशीच एक फिल्म आहे. हा फक्त सिनेमा नाही, तर असा प्रश्न आहे जो थिएटरमधील दिवे बंद झाल्यानंतरही तुमच्या मनात घोळत राहतो. इतक्या गंभीर आणि विचार करायला लावणाऱ्या चित्रपटाचा भाग होणं, फक्त प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा खूप अधिक समाधान देणारं आहे.”

संजय दत्त आणि अभिजीत मोहन वारंग यांच्यासोबत काम करण्याबाबत त्या म्हणाल्या,

“नॅशनल अवॉर्ड विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग, ज्यांची दृष्टी कथाकथनात एक दुर्मिळ खोली आणते, त्यांच्यासोबत काम करणं आणि संजय दत्तसारख्या दिग्गज अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणं हा खरोखरच परिवर्तन घडवणारा अनुभव होता. हे शिकण्याचं, पुढे जाण्याचं आणि स्वतःला पुन्हा शोधण्याचं एक प्रवास होतं.”

‘आखिरी सवाल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नॅशनल अवॉर्ड विजेते फिल्ममेकर अभिजीत मोहन वारंग यांनी केले आहे. निखिल नंदा प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती निखिल नंदा आणि संजय दत्त यांनी केली असून, पुनीत नंदा, डॉ. दीपक सिंह, गौरव दुबे आणि उज्ज्वल आनंद हे सह-निर्माते आहेत. कथा, पटकथा आणि संवाद उत्कर्ष नैथानी यांनी लिहिले आहेत. हा चित्रपट ८ मे २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Khalnayak Returns: भयानक अवतारात दिसला संजय दत्त, लुक पाहून अंगावर येईल काटा; 1993 च्या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा

Web Title: Neetu chandra shared working experience with national award winner abhujeet warang

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Entertainment News
  • Sanjay Dutt

संबंधित बातम्या

Sanjay Dutt Marathi Controversy: ‘6 वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, तरी मराठी शिकलो नाही..’;संजय दत्तचं वक्तव्य चर्चेत
1

Sanjay Dutt Marathi Controversy: ‘6 वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, तरी मराठी शिकलो नाही..’;संजय दत्तचं वक्तव्य चर्चेत

Mirzapur The Movie Box Office: ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्या दिवशी कमाईत २४.३% वाढ; ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
2

Mirzapur The Movie Box Office: ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्या दिवशी कमाईत २४.३% वाढ; ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

Mirzapur The Movie: ‘बीना भाभी’च्या BOLD .सीन्सची चर्चा; अभिनेत्रीने सांगितलं, शूटिंग कसं व्हायचं?
3

Mirzapur The Movie: ‘बीना भाभी’च्या BOLD .सीन्सची चर्चा; अभिनेत्रीने सांगितलं, शूटिंग कसं व्हायचं?

R. Madhavan: थिएटर गाजवल्यानंतर आता आर. माधवनचा पॅशन प्रोजेक्ट GDN होणार Netflix वर प्रदर्शित!
4

R. Madhavan: थिएटर गाजवल्यानंतर आता आर. माधवनचा पॅशन प्रोजेक्ट GDN होणार Netflix वर प्रदर्शित!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.