कोल्हापूरातील वारणा महिला उद्योग समूहात लिज्जत पापड करणाऱ्या 42 महिलांना विमानाची सफर घडवली. आज सकाळी कोल्हापूरातून मुंबईला या महिला विमानाने रवाना झाल्यात. आमदार विनय कोरे आणि वारणा महिला उद्योग समुहाच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांच्या प्रयत्नाने महिलांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाची मोहर उमटल्याचं पहायला मिळालं. दररोज अगदी पहाटेपासून दिवसभर या महिला पापड करण्यासह आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळतात. या महिलांनी विमानाचा प्रवास लांबच साधं विमानतळ सुद्धा पाहिलं नव्हतं. याचीच दखल घेवून महिलांना विमानवारी घडवण्याची भूमिका शुभलक्ष्मी कोरे यांनी घेतली आणि आज या महिला चक्क कोल्हापूरातून विमानाने मुंबईला रवाना झाल्या.