सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आज महानगरपालिकेच्या सभागृहात पीठासन अधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर आणि उपमहापौरांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये महापौर पदावर भाजपाचे धीरज सूर्यवंशी तर उपमहापौर पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मगदूम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान इथून पुढच्या काळामध्ये तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्व पक्षातील नेते नगरसेवक यांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचा विश्वास महापौर धीरज सूर्यवंशी व उपमहापौर गजानन मगदूम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय. यावेळी महानगरपालिकेसमोर महापौर आणि उपमहापौरांच्या समर्थकांनी प्रचंड उत्साहात गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात एकच जल्लोष केला. .