फोटो सौजन्य: नोरा फतेही इन्स्टाग्राम
मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्री अशा बहुआयामी नोरा फतेहीचा आज वाढदिवस आहे. तिने आपल्या आरस्पानी सौंदर्यावर आणि मादक डान्स मुव्हजने प्रेक्षकांचे मन जिंकलेय. चाहत्यांमध्ये, बेली डान्सर म्हणून प्रसिद्ध झालेल्या नोराचा इथवरचा काही सोप्पा नव्हता. नोराचा जन्म ६ फेब्रुवारी १९९२ रोजी कॅनडामध्ये झाला. आज नोरा तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.
सोशल मीडियावर नोराचे लाखो फॅन्स आहेत. ‘रोर : टायगर ऑफ द सुंदरबन्स’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिला टॉलिवूडमध्येही अनेक संधी मिळाल्या. नोरा फतेहीच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने तिच्या आयुष्याशी संबंधित अशा अनेक खास गोष्टी जाणून घेऊया…
ॲक्शन आणि हॉररचा मेगा डोस Ultra Jhakas OTT वर प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार, पाहा यादी…
अतिशय खडतर प्रवास करून बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण करण्यासाठी तिने वयाच्या १६ व्या वर्षापासून काम सुरु केलं आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. कुटुंबाची जबाबदारी नोराच्या खांद्यावर होती. नोराने आपल्या भावाला लहानाचं मोठं करण्यासाठी फार कठोर परिश्रम घेतले होते. तिने घरातल्यांचं पालन पोषण करण्यासाठी टेलिमार्केटिंग, वेट्रेसिंग, बार्टेंडिंग आणि कॅफेमध्ये काम केलं आहे. याच दरम्यान नोराला तिची स्वप्नं अपूर्ण राहत असल्याचं जाणवलं. आपले स्वप्न अपूर्ण राहत असल्याचं तिला जाणवू लागल्यावर तिने मोरोक्कोहून भारत गाठलं. भारतात आल्यानंतरही तिच्या नशीबात मेहनत कायम होतीच.
स्त्रीशक्तीचा जागर; आई तुळजाभवानीचा अद्वितीय दृष्टिकोन येणार समोर!
ती संधीच्या शोधात तासनतास रांगेत उभी राहायची, पण केव्हा नोराने हार मानली नाही. ‘रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’ आणि प्रकाश झा यांच्या प्रोजेक्टमधून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये करत तिने अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केलं. इंडस्ट्रीत अनेक नकारांना सामोरे जावे लागल्यानंतरही नोराने आपलं स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. कायमच तिच्या अभिनयाचीच नाही तर, फॅशनचीही जोरदार चर्चा चाहत्यांमध्ये होते. नोरा केवळ एक उत्तम डान्सरच नाही, तर मार्शल आर्ट्समध्येही माहिर आहे. नोरा फतेहीने बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीलाही डान्स शिकवला आहे. नोरा फतेही इंग्रजी आणि हिंदीशिवाय फ्रेंच आणि अरबी भाषाही बोलू शकते.
‘लागिरं झालं जी’ फेम निखिल चव्हाणचं रंगभूमीवर पदार्पण, एक नव्हे तर दोन नाटक गाजवणार…
रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या नऊव्या सीझनमध्ये झळकल्यानंतर नोराने प्रेक्षकांमध्ये एक अव्वल स्थान निर्माण केले आहे. सलमान खानच्या या शोमध्ये जो कोणी येतो, तो ओळख निर्माण करूनच जातो, हे नक्की आहे. यानंतर 2016 मध्ये ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोमध्ये नोराने तिची डान्सची प्रतिभा दाखवली. नोरा क्रिकेटची प्रचंड मोठी फॅन असून ती सचिन तेंडुलकरची मोठी फॅन आणि युवराज सिंगची चांगली मैत्रीण आहे. बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाचा पती अंगद बेदी ह्याला नोराने अनेक वर्षे डेट केले होते. अनेक काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांचेही ब्रेकअप झाले. ब्रेकअपमधून सावरण्यासाठी तिला फार वेळ लागल्याचे तिने सांगितले होते. २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबतही नोराचं नाव जोडलं होतं. त्याच्याकडून तिने काही गिफ्ट्स घेतल्याचाही तिच्यावर आरोप होता.






