राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सध्या वादग्रस्त भाषणामुळे चर्चेत आहेत. गुजराती आणि राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी होणार नाही, असे विधान राज्यपालांनी केले होते. त्यानंतर हे वक्तव्य ऐकून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण आपली मते मांडत आहेत. यामध्ये मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनीही आपले मत मांडले आहे.
नागपुरातील एका कार्यक्रमात भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सचिन पिळगावकर म्हणाले की, ‘आम्हाला याबद्दल काहीच माहिती नाही, असे त्यांनी का म्हटले ते फक्त तेच सांगू शकतात. राजकीय विषयांशी आमचा काहीही संबंध नाही. त्यांनी खुलासा केला की नाही हे देखील आम्हाला माहित नाही. राजकारण हा आमचा विषय नाही. पण आम्हाला मराठी असल्याचा अभिमान आहे.
गुजराती आणि राजस्थानी निघून गेल्यास मुंबईत पैसा उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी होणार नाही, असे भागतसिंग कोश्यारी यांनी म्हटले आहे. काल मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील एका स्थानिक चौकाला स्वर्गीय श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांचे हे विधान महाराष्ट्राचा अवमान करणारे आहे, त्यांना नारळ देण्याची मागणी आता विरोधकांनी केली आहे.