आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी(फोटो-सोशल मीडिया)
IND VS PAK Asia Cup 2025 Final : आशिया कप २०२५ चा अंतिम सामना रविवारी, २८ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून विजेतेपद जिंकले. विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून विजेती ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यानंतर मोहसीन नक्वी यांनी ट्रॉफी आपल्या सोबत घेऊन गेले. मोहसिन नक्वी यांच्या या वर्तनावर टीका करण्यात आली होती. दरम्यान आज, आशियाई क्रिकेट परिषदेची मंगळवारी दुबई मुख्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. आशिया कपच्या अंतिम सामन्यादरम्यान ट्रॉफी नाकारल्याबद्दल भारताकडून तीव्र निषेध करण्यात आला.यावर आता या बैठकीत मोहसिन नक्वी यांनी आपली बाजू मांडताना म्हटले आहे की, माझ्याकडून ट्रॉफी घेण्यात येणार नाही, याबद्दल एसीसीला सांगण्यात आले नाही.
हेही वाचा : IND vs PAK : PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी सुधारण्याच्या पलीकडे! Asia cup ट्रॉफी परत करणार, पण घातली ‘ही’ अट
बीसीसीआयच्या प्रश्नाला उत्तर देताना नक्वी म्हणाले की, “भारत माझ्याकडून आशिया कप ट्रॉफी स्वीकारणार नाही असे मला सांगितले गेले नाही.” आशियाई क्रिकेट परिषदेने मंगळवारी, 30 सप्टेंबर रोजी दुबई येथील मुख्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. आशिया कपच्या अंतिम सामन्यानंतर ट्रॉफी सोबत घेऊन गेल्याबद्दल भारताकडून तीव्र निषेध करण्यात आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बैठकीदरम्यान मोहसिन नक्वी यांनी आपकी बाजू मांडली आणि म्हटले की, “भारतीय संघ माझ्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही याची एसीसीला लेखी माहिती देण्यात दिली गेली नव्हती. मी विनाकारण तिथे कार्टूनसारखा उभा होतो.”
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी बैठकीत एसीसी आणि पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांना प्रश्न केला की, “विजेत्या संघाला ट्रॉफी का सादर करण्यात आली नाही. ही एसीसीची ट्रॉफी आहे; ती अधिकृतपणे विजेत्या संघाला सादर करायला पाहिजे.”
क्रिकबझच्या वृत्तानुसार, भारताकडून राजीव शुक्ला आणि आशिष शेलार हे देखील प्रमुख एसीसी सदस्यांसह बैठकीला उपस्थित होते. दोघेही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सामील झाले होते. बैठकीत असे ठरवण्यात आले की कौन्सिलचे कसोटी खेळणारे सदस्य, भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान, ट्रॉफी वाद सोडवण्यासाठी भेटणार आहेत.”
रविवारी, २८ सप्टेंबर रोजी झालेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. सामन्यानंतरच्या सादरीकरणात वैयक्तिक पुरस्कार स्वीकारल्यानंतर, एसीसी प्रमुख मोहसिन नक्वी भारतीय संघाला विजयी ट्रॉफी आणि खेळाडूंना पदके देऊ इच्छित होते., परंतु, भारताकडून नकरण्यात आले. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि टीमने ट्रॉफीशिवाय अंतिम विजय साजरा केला आणि २९ सप्टेंबर रोजी संघ ट्रॉफीशिवाय भारतात परतला.