कपड्यांशिवाय झोपल्याचे फायदे आणि तोटे (फोटो सौजन्य - iStock)
कामावरून किंवा बाहेरून घरी परतल्यावर लोक सर्वात आधी कपडे बदलतात, कारण त्यांना त्यांच्या घरातील कपड्यांमध्ये आराम मिळतो. विशेषतः उन्हाळ्यात तर बाहेरून आल्या आल्या आंघोळ करून कपडे बदलल्यावर बरे वाटते. जेव्हा लोक आर्द्रतेने आणि घामाने कंटाळलेले असतात आणि कधी एकदा अंगावरील कपडे काढून टाकतोय असं वाटत असतं तेव्हा तर असे करणे ग्राह्यच आहे.
तर बऱ्याच जणांना घामाचा त्रास होतो म्हणूनच बरेच लोक फक्त अंतर्वस्त्रे घालून घरी राहतात. काही लोक असेही आहेत ज्यांना रात्री कपड्यांशिवाय झोपण्याची सवय असते. यामुळे त्यांना आराम मिळतो आणि चांगली झोप येते. आज आम्ही तुम्हाला असे करण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही सांगणार आहोत. तुम्ही नक्की कोणत्या गटात बसता पहा बरं!
रात्री गाढ आणि शांत झोपेसाठी सद्गुरूंनी सांगितलेले ‘हे’ उपाय नक्की करा, लागेल सुखाची शांत झोप
कपड्यांशिवाय झोपण्याचे फायदे
Sleep Foundation ने केलेल्या अभ्यासानुसार, अनेक जणांना रात्री झोपताना अंगावर कपडे न घालता झोपायची सवय असते. काही जण तर अक्षरशः अंगावर एकही कपडा ठेवत नाहीत आणि न्यूड झोपतात. असे केल्याने शरीराला काही फायदे नक्कीच मिळतात. पण बरेच जण कपड्यांशिवाय झोपतात कारण असे केल्याने त्यांना अधिक आराम मिळतो
१. चांगली झोप: healthline.com वर प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार, कपड्यांशिवाय झोपल्याने शरीराला अधिक आराम मिळतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. काही संशोधनांमध्ये असा दावा केला आहे की कपड्यांशिवाय झोपल्याने संपूर्ण त्वचेला आराम मिळतो, ज्यामुळे गाढ झोप येते.
२. त्वचेचे आरोग्य: कपड्यांशिवाय झोपण्याचा एक फायदा म्हणजे त्वचेला श्वास घेता येतो, ज्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतात.
३. शरीराचे तापमान नियंत्रित होते: अनेकदा असे घडते की हवेच्या संपर्कात असलेल्या शरीराच्या भागांचे तापमान कमी होते, तर शरीराच्या इतर भागांचे तापमान वाढते. अशा परिस्थितीत, कपड्यांशिवाय झोपल्याने शरीराचे तापमान नियंत्रित होण्यास मदत होते, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते
४. मानसिक शांती: काही संशोधनांमध्ये असाही दावा केला आहे की कपड्यांशिवाय झोपल्याने मानसिक शांती आणि विश्रांती मिळते, ज्यामुळे ताण कमी होतो.
५. हार्मोनल संतुलन: www.sleepfoundation.org वर प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, कपड्यांशिवाय झोपल्याने हार्मोनल संतुलन सुधारते, ज्यामुळे विविध शारीरिक कार्ये सुधारतात.
६. वाढलेली प्रजनन क्षमता: एका अभ्यासात असे आढळून आले आहे की जे पुरुष सैल अंडरवेअर घालतात त्यांच्यात शुक्राणूंची संख्या जास्त असते. कपड्यांशिवाय झोपल्याने अंडकोष थंड राहतात आणि शुक्राणूंच्या आरोग्यासाठी योग्य तापमान राखण्यास मदत होते. यामुळे पुरुषांची प्रजनन क्षमता वाढू शकते.
७. यीस्ट इन्फेक्शन: कपड्यांशिवाय झोपल्याने योनीचे आरोग्य सुधारते आणि यीस्ट इन्फेक्शनचा धोका कमी होतो. घट्ट किंवा घामाने भरलेले अंडरवेअर घालल्याने यीस्ट इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो, कारण यीस्ट उबदार आणि ओलसर ठिकाणी वाढतो. कपड्यांशिवाय झोपल्याने योनीचा भाग कोरडा आणि हवेशीर राहण्यास मदत होते.
झोप पूर्ण करत चला रे! अपुरी झोप म्हणजे डोळे-नखांवर ‘या’ लक्षणांना आमंत्रण
कपडे न घालता झोपण्याचे तोटे
कपड्यांशिवाय झोपण्याचे काही तोटे असू शकतात. त्वचेच्या कोणत्याही समस्या असलेल्या लोकांनी असे करणे टाळावे. असे केल्याने तुमच्या बेडशीट आणि ब्लँकेटवर बॅक्टेरिया वाढू शकतात, ज्यामुळे इतरांना संसर्ग होऊ शकतो. यामुळे बुरशीजन्य संसर्ग लवकर होऊ शकतो, त्यामुळे असे करणे टाळावे.
हिवाळ्यात कपड्यांशिवाय झोपणाऱ्या लोकांना झोपेचा त्रास होऊ शकतो. रात्री घट्ट अंडरवेअर किंवा कपड्यांमध्ये झोपणे धोकादायक असू शकते, म्हणून सैल कपडे घालणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. उन्हाळ्यात तुम्ही कपड्यांशिवायदेखील झोपू शकता. मात्र पावसाळा आणि हिवाळा या दोन्ही ऋतुंमध्ये तुम्ही असे करणे तुमच्या शरीरासाठी आणि त्वचेसाठीही त्रासदायक ठरू शकते.