Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिग बींच्या 4,999व्या ट्विटवरून राजकारण सुरू, शिवसेना ठाकरे गट आणि भाजप एकमेकांना भिडले, श्रेयवादाची लढाई सुरू!

बच्च्चन यांनी त्यांच्या 4,999 व्या ट्विटमध्ये मुंबई कोस्टल रोडचे कौतुक केले, त्यानंतर कोस्टल रोडवरुन आता राजकारण सुरू झाले आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 03, 2024 | 03:32 PM
बिग बींच्या 4,999व्या ट्विटवरून राजकारण सुरू, शिवसेना ठाकरे गट आणि भाजप एकमेकांना भिडले, श्रेयवादाची लढाई सुरू!
Follow Us
Close
Follow Us:

सध्या बॅालिवूड महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. Kalki 2898 AD या चित्रपटात ते अश्वत्थामाची भूमिका साकारणार आहे. त्यांचा फर्स्ट लूक समोर आल्यापासून प्रेक्षकांना त्यांना रुपेरी पडद्यावर पहायची उत्सुकता वाढली आहे. पण आता बिग बी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. ते म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या एका ट्विटनंतर महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांनी नुकतचं मुंबईच्या कोस्टल रोडचे कौतुक करणारे ट्विट केलं होतं. बिग बींचे ट्विट व्हायरल होताच  त्यावर श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. या रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी उद्धव ठाकरे गटातील शिवसेना आणि भाजपमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.

[read_also content=”कपिल शर्मामुृळे नेटफ्लिक्सला बसला 25 कोटींचा फटका, शो बंद करण्याची आलीये वेळ;शेवटच्या एपिसोडचे शूटिंग पूर्ण! https://www.navarashtra.com/movies/the-great-indian-kapil-show-is-going-to-off-air-soon-nrsp-529445.html”]

बिग बींनी काय ट्विट केलं?

नेत्यांनी वक्तव्य करण्यापूर्वी या प्रकरणाला सुरुवात करणाऱ्या ट्विटमध्ये काय लिहिले आहे ते जाणून घेऊया. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या 4,999 व्या ट्विटमध्ये मुंबई कोस्टल रोडचे कौतुक केले आणि लिहिले की JVPD, जुहू ते मरीन ड्राइव्ह असा प्रवास करण्यासाठी 30 मिनिटे लागली. स्वच्छ आणि चांगला रस्ता असे त्यांनी वर्णन केले.

T 4999 – Oh ! Boy !! went to work .. after Sea Link on to Coastal Road and Tunnel underground .. JVPD, Juhu to Marine Drive , 30 mins .. !!
वाह ! क्या बात है ! साफ़ सुथरी नयी बढ़िया सड़क, कोई रुकावट नहीं ??
— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 2, 2024

आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

बिग बींच्या या ट्विटवर भाजप समर्थकांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. भाजप आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून हा रस्ता तयार झाल्याचे या सर्वांचे म्हणणे आहे. त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, हा प्रकल्प शिवसेना यूबीटी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा आहे. आदित्य ठाकरे इथेच थांबले नाहीत. त्यांनी उपहासात्मकपणे सांगितले की, या प्रकल्पाशी भाजपचा संबंध एवढाच आहे की, पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घेण्यासाठी दोन वर्षे लागली.

शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि भाजपचे संबंधित दावे असले तरी वास्तविक पाहता हा रस्ता मुंबई महापालिकेने बांधला आहे. २०२२ पर्यंत बीएमसी उद्धव ठाकरेंच्या पक्ष शिवसेनेच्या ताब्यात होती. या प्रकल्पाचे भूमिपूजनही उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. मात्र, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.

Web Title: Politics on amitabh bachchan tweet on mumbai coastal road uddhav shiv sena and bjp clashed with each other nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2024 | 02:59 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • amitabh bachchan
  • Chief Minister Eknath Shinde
  • entertainment
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

“जयाने पांढरी साडी नेसली, तर तू..”, अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेसाठी आई तेजी बच्चन यांनी दिली होती धमकी
1

“जयाने पांढरी साडी नेसली, तर तू..”, अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेसाठी आई तेजी बच्चन यांनी दिली होती धमकी

Nita Ambani: नीता अंबानींनी त्यांच्या नातीला म्हटले ‘लक्ष्मी’, हृदयस्पर्शी व्हिडिओने वेधले लक्ष
2

Nita Ambani: नीता अंबानींनी त्यांच्या नातीला म्हटले ‘लक्ष्मी’, हृदयस्पर्शी व्हिडिओने वेधले लक्ष

‘तीनों भाई, तीनों तबाही’, इब्राहिम, तैमूर आणि जेहला एकत्र पाहून चाहते खुश; सोशल मीडिया पोस्टने उडाली खळबळ
3

‘तीनों भाई, तीनों तबाही’, इब्राहिम, तैमूर आणि जेहला एकत्र पाहून चाहते खुश; सोशल मीडिया पोस्टने उडाली खळबळ

‘या’ दिवाळीत परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा करणार पहिल्या बाळाचे स्वागत, अभिनेत्री रुग्णालयात दाखल
4

‘या’ दिवाळीत परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा करणार पहिल्या बाळाचे स्वागत, अभिनेत्री रुग्णालयात दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.