Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्वत:चं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्यांचं बघायचं वाकून’; ठाकरे बंधूंच्या मुंबईतील मोर्चावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

२६ जुलै रोजी मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत भव्य शक्तीप्रदर्शनाची घोषणा केली आहे. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 23, 2026 | 04:10 PM
‘स्वत:चं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्यांचं बघायचं वाकून’; ठाकरे बंधूंच्या मुंबईतील मोर्चावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Follow Us
Follow Us:
  • ‘स्वत:चं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्यांचं बघायचं वाकून’
  • ठाकरे बंधूंच्या मुंबईतील मोर्चावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
  • म्हणाले…
CM Devendra Fadnavis on Thackeray Brothers: दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीवरून केंद्र सरकारवर (Central Goverment) जोरदार हल्ला चढवण्यासाठी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार आहे. २६ जुलै रोजी मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत भव्य शक्तीप्रदर्शनाची घोषणा केली आहे. या मोर्चाच्या माध्यमातून विविध सामाजिक, प्रशासकीय आणि राज्याशी संबंधित मुद्दे केंद्र सरकारसमोर मांडण्याचा निर्धार दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

मी आठवण करुन देतो, राज्यातला सर्वात मोठा टीईटी घोटाळा उद्धव ठाकरे मु्ख्यमंत्री असताना झाला. यामध्ये आएसएस अधिकाऱ्यांपासून सगळे सामील होते. इतका मोठा घोटाळा राज्याच्या इतिहासात झाला नाही. तसेच केवळ टीईटी घोटाळाच झाला नाही, तर जे नापास होते, त्यांना पास करण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात झालं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आम्ही टीईटी परिक्षेत घोटाळा होत असल्याचं लक्षात येताच, परिक्षेआधी घोटाळेबाजांना पकडलं. स्वत:चं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून हे बंद करा, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

🕝 2.18pm | 23-7-2026📍Mumbai. LIVE | Media Interaction#Maharashtra #Mumbai https://t.co/601PT5icNd — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 23, 2026

ठाकरे बंधूंची केंद्र सरकारवर जोरदार टीका

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नीट पेपरफुटी आणि दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी ठाकरे बंधूं म्हणाले की, विद्यार्थ्यांवर जो दबाव टाकला जात आहे आणि ज्या प्रकारे त्यांना मारहाण केली जात आहे, त्याचा परिणाम देशभरात होत आहे. हे प्रकरण आता त्यांच्या पलीकडे जाऊन पंतप्रधान आणि गृह मंत्रालयापर्यंत पोहोचले आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दिल्लीत विद्यार्थ्यांना भेटून आपला अनुभव सांगताना उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थिनींचे कपडे कसे फाडले गेले आणि त्यांना खिळे लावलेल्या काठ्यांनी कसे मारहाण करण्यात आली, याचे वर्णन केले.

CJP Protest Live: जंतर-मंतरवर विद्यार्थ्याचे आंदोलन, अभिजीत दिपके कुठे आहे?

‘हा मतपेटीचा नव्हे, न्यायाचा विषय’

राज ठाकरे म्हणाले की, हा प्रश्न कोणत्याही पक्षाच्या राजकारणाचा नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे. “हा मतपेटीचा विषय नाही, हा न्यायाचा विषय आहे. विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. त्यांचा आवाज ऐकण्याऐवजी प्रश्न विचारणाऱ्यांनाच देशद्रोही ठरवण्याची प्रवृत्ती वाढत आहे,” असा आरोप त्यांनी केला. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि देशभरातील वाढता संताप लक्षात घेता, सरकारने दडपशाहीचा मार्ग न स्वीकारता संवादातून प्रश्न सोडवावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

पोलिसांच्या व्हायरल व्हिडिओवरून राज ठाकरे आक्रमक

पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओचाही उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनासाठी जाणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एका पोलिसाने “50 ग्रॅम पावडर टाकेन” अशी धमकी दिल्याचा व्हिडिओ त्यांच्या पाहण्यात आला आहे. याबाबत त्यांनी संताप व्यक्त करत, “हा पोलीस ड्रग्स सप्लायर आहे का? पोलिसांकडे पावडर कुठून आली?” असा सवाल उपस्थित केला. हा व्हिडिओ आपण मुंबई पोलिस आयुक्तांकडे पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Rahul Narwekar: ‘उद्धव ठाकरे नेहमी चुकीचेच व्यासपीठ निवडतात’; राहुल नार्वेकर यांचा थेट टोला, तर काँग्रेसवरही जोरदार निशाणा

Web Title: Devendra fadnaviss first reaction to the thackeray brothers rally in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Politics
  • raj thackeray
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

दुष्काळ आणि अल निनोच्या संकटात शेतकरी होरपळला; ‘विशेष पॅकेज जाहीर करा’, धीरज देशमुखांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
1

दुष्काळ आणि अल निनोच्या संकटात शेतकरी होरपळला; ‘विशेष पॅकेज जाहीर करा’, धीरज देशमुखांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

‘गणपतीत दंगली घडवण्याचा ‘प्लॅन’? राज ठाकरेंनंतर आदित्य ठाकरेही आक्रमक; म्हणाले, ‘कुठेतरी षडयंत्र दिसतंय!’
2

‘गणपतीत दंगली घडवण्याचा ‘प्लॅन’? राज ठाकरेंनंतर आदित्य ठाकरेही आक्रमक; म्हणाले, ‘कुठेतरी षडयंत्र दिसतंय!’

Gunratna Sadawarte : ‘आधी शिवसेना भवनातील बाळासाहेबांचा फोटो काढा, नाहीतर..,’; सदावर्तेंचा थेट इशारा, 15 दिवसांची डेडलाइन
3

Gunratna Sadawarte : ‘आधी शिवसेना भवनातील बाळासाहेबांचा फोटो काढा, नाहीतर..,’; सदावर्तेंचा थेट इशारा, 15 दिवसांची डेडलाइन

DJ Ban Controversy : ‘राज ठाकरेंच्या डोक्याचा खोका खाली आहे का?’; DJ बंदीवरून गुणरत्न सदावर्तेंचा घणाघाती हल्ला
4

DJ Ban Controversy : ‘राज ठाकरेंच्या डोक्याचा खोका खाली आहे का?’; DJ बंदीवरून गुणरत्न सदावर्तेंचा घणाघाती हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.