mirjole padawewadi village Ratnagiri Taluka Level Drama Competition inaugurated
रत्नागिरी- जमीर खलफे
शहरा नजिकच्या मिरजोळे येथील श्री माघी गणेशोत्सव मंडळ, पाडावेवाडी यांच्यावतीने शनिवार दि. 1 फेब्रुवारी ते सोमवार दि. 8 फेब्रुवारी 2025 या कालावधीत माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या उत्सवादरम्यान रत्नागिरी तालुकास्तरीय नाटय़ स्पर्धेचा शुभारंभ झाला आहे. या आयोजनाबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषेनुसार शुक्रवार 31 जानेवारी रोजी गणरायाचे सायंकाळी आगमन करण्यात आले. शनिवार दि. 1 फेब्रुवारीपासून या गणेशोत्सवाला प्रारंभ झालेला आहे. त्यानिमित्त उत्सवादरम्यान दररोज सायं. 7.00 वाजता श्रींची आरती कार्यक्रम होणार आहे. दि. 01 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.00 वा. श्रींची प्रतिष्ठापना झाली. पहिल्या दिवशी 1 रोजी नाट्य स्पर्धेचा शुभारंभ झाला. त्यावेळी नाटक – मी तर बुवा अर्धा शहाणा (नूतन बालमित्र बोरकर संगीत नाटय़ मंडळ, वरवडे) यांनी सादरीकरण केले. रविवार दि. 2 फेब्रुवारी रोजी रात्रौ 10.00 वा. नाटक : चांदणी (कलारंग, रत्नागिरी) यांनी सादरीकरण केले.
‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’; पुष्कर जोगच्या आगामी चित्रपटाच्या मोशन पोस्टरने वाढली उत्सुकता…
सोमवार दि. 3 फेब्रुवारी रोजी सायं. 8.00 ते 9.00 वा. भजन मधलीवाडी, मिरजोळे, रात्रौ 10.00 वा. नाटक : नाटक : गंध निशिगंधाचा (जुगाईदेवी आणि सुयोग कलामंच गावडेआंबेरे). मंगळवार दि. 4 फेब्रुवारी रोजी सायं. 8.00 ते 9.00 वा. भजन: पाडावेवाडी, मिरजोळे, रात्रौ 10.00 वा. नाटक : कडीपत्ता (कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघ, कोतवडे), बुधवार दि. 5 फेब्रुवारी रोजी सायं. 8.00 ते 9.00 वा. भजन: सोंबा रवळनाथ भजन मंडळ, बांबर, रात्रौ 10.00 वा. नाटक : इष्काची इंगळी डसली (संकल्प कलामंच, रत्नागिरी), सादरीकरण होणार आहे.
गुरूवार दि. 6 फेब्रुवारी रोजी सायं. 8.00 ते 9.00 वा. भजन: कालिकादेवी भजन मंडळ, पाडावेवाडी, रात्रौ 10.00 वा. नाटक : नाती गोती (श्री सिद्धीविनायक कलामंच, रत्नागिरी). शुक्रवार दि. 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वा. श्री सत्यनारायणाची महापुजा, दुपारी 1.00 ते 3.00 वा. महाप्रसाद, सायं. 8.00 ते 9.30 वा. मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण सोहळा, वा त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम. शनिवार दि. 8 फेब्रुवारी रोजी सायं 4 ते 8 वा. श्रींची विसर्जन मिरवणूक अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे सर्व भाविक व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री माघी गणेशोत्सव मंडळ पाडावेवाडी आणि व्यवस्थापक, श्री कालिकादेवी नाटय़कलामंच, मिरजोळे, पाडावेवाडी यांनी केले आहे.