बिग बॉस मराठी ५ सीझनमध्ये रितेश देशमुख दिसणार नव्या भूमिकेत
बिग बॉस मराठीसीझन 4 नंतर आजपासून पुन्हा एकदा बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व सुरु होणार आहे. मराठी बिग बॉस प्रेमींना आतुरता असलेला दिवस अखेर आज आला आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे होस्टिंग रितेश देशमुख करणार असल्याने अनेक लोक हा शो पाहण्यासाठी उत्सुक आहेत. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये नेमकं कोण कोण येणार याची उत्सुकता सगळ्यांचं लागली आहे. तर नुकताच बिग बॉसच्या घरात दाखल होणाऱ्या स्पर्धकांचे नॉन रिव्हिलिंग प्रोमो शेअर करण्यात आले आहेत. शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये सुरांच्या बादशाहची एन्ट्री होणार आहे. पण बादशाहा नेमका कोण? हे पाहण्याची अनेकांना उत्सुकता लागली आहे.(फोटो सौजन्य-instgaram)
काही दिवसांआधी बिग बॉस मराठी पाचव्या सीझनचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर हा शो रितेश देशमुख होस्ट करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख बिग बॉस मराठी होस्ट करत असल्याने येणाऱ्या नवीन पर्वात नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.बिग बॉस मराठीचा पहिला प्रोमो सादर झाल्यानंतर सुरांच्या बादशाहाची या शो मध्ये इंट्री होणार दाखवण्यात आले होते. हा सुरांचा अभिजीत सावंत असल्याच्या चर्चा सगळीकडे आहेत.
हे देखील वाचा: बिग बॉसचे हे स्पर्धक टॉप ५ च्या यादीत! पहिल्या फायनलिस्टचे नाव आले समोर
तसेच मराठी बिग बॉसच्या घरामध्ये परदेशी अप्सरेची एंट्री होणार आहे. ही परदेशी अप्सरा नेमकी कोण हे अजूनही गुपित ठेवण्यात आले आहे. बिग बॉसच्या घरात परदेशी अप्सरेची एंट्री होणार असल्याचे प्रोमोमध्ये सांगण्यात आले आहे. तर बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये साडी नेसून हे कसं करावं? असे बोलणाऱ्या चाहत्यांच्या लाडक्या साडीवाल्या काकूंनी थेट बिग बॉसच्या घरात इंट्री केली आहे. त्यांनी थेट बिग बॉसच्या घरात घेतलेल्या इंट्रीला पासून अनेकांनी त्यांच्या कौतुक केले आहे.
बिग बॉसच्या घरात इंट्री घेताना त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी चाहत्यांना सांगतिले, बिग बॉसच्या घरात साडी नेसून ग्रँड एन्ट्री कशी करायची? हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. मस्त सिम्पल, सोबर साडी नेसा… फ्लोइंग पल्लू सोडा, आत्मविश्वास असू देत, तुमच्या चालण्यात आणि डोळ्यांमध्ये… चेहऱ्यावर छान स्माईल ठेवा, डोळ्यांनी सगळीकडे पाहा आणि ग्रेसफुली सोफ्यावर तुम्ही बसून घ्या. स्माईल नेहमी चेहऱ्यावर असून देत आणि सगळ्या गोष्टी तुम्ही अशा ग्रेसफुली करा.”