(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
सैफ अली खानच्या हल्ल्याप्रकरणी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. मुंबई पोलिसांनी शुक्रवारी (१७ जानेवारी) सैफ अली खानच्या हल्ल्याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. हल्लेखोराने शाहरुख खानच्या घराची रेकीही केल्याचे सांगण्यात येत आहे. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीने शाहरुख खानच्या घराची रेकीही केल्याचे समोर आले आहे.
सैफवर झालेल्या हल्ल्याबाबत अखेर करीनाने सोडले मौन, म्हणाली, “हा दिवस माझ्या कुटुंबासाठी…
सैफ अली खानच्या हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांच्या वेगवेगळी टीम तैनात होती, आता त्यांना काहीसं यश हाती आल्याचं पाहायला मिळत आहे. हा आरोपी बांद्रा रेल्वे स्थानकात असलेल्या कॅमेऱ्यातही कैद झाला होता, तो वसई- विरारच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसून जाताना दिसत होता. त्याच संशयिताला बांद्रा पोलिसांच्या एका टीमने पकडले आहे. त्याच संशयिताला बांद्रा पोलिसांची टीम आता बांद्रा पोलिस स्टेशन परिसरात दाखल झाली आहे.
त्या संशयिताची पोलिस आता अधिकाधिक चौकशी करत आहेत. सैफच्या घरावर हल्ला करणारा हाच हल्लेखोर आहे का? सैफच्या घरात घुसून अभिनेत्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराच्या संपर्कात हा संशयित होता का ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिसांना या हल्लेखोराकडून मिळण्याची शक्यता आहे. सैफवर हल्ला झाल्यानंतर बांद्रा पोलिसांकडून दुधवाला, पेपरवालासह बिल्डिंगमधील अनेक कर्मचाऱ्यांची पोलिसांनी चौकशी केली होती. संशयिताकडून पोलिसांना काही धागेदोरे मिळतात का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हल्लेखोराची सैफच्या मोलकरणीकडे १ कोटी खंडणीची मागणी; FIRमध्ये मोठी अपडेट समोर
दरम्यान, शाहरुखच्या मन्नत बंगल्यावरही याच संशयिताकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आहे. घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतानाचा सीसीटीव्हीही समोर आले होते. अभिनेत्याच्या बंगल्याची संरक्षक भिंत फार मोठी असल्यामुळे आणि त्यावर पुढे जाळी असल्यामुळे काहीसा त्या घुसखोराचा प्रयत्न अपयशी ठरला. सैफच्या घरामध्ये हल्ला करणारा घुसखोर शाहरुखच्या बंगल्यावरही घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचा संशय पोलिसांना आहे. या दोन्हीही प्रकरणाची पोलिस कसून चौकशी करत असून बांद्रा परिसरात सध्या काहीसं चिंतेचं वातावरण आहे.
कारण की,जर इतक्या बड्या सेलिब्रिटींच्या घरी हल्लेखोरांकडून हल्ला केला जात असेल तर सामान्य नागरिकांचं काय असा प्रश्नही उपस्थित होतो. सेलिब्रिटीच जर सुरक्षित नसतील तर, सामान्य माणूस कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्नही पडतो. वांद्रा पोलिस स्टेशन परिसरात इतक्या घटना घडत असल्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या वांद्रा पोलिस स्थानकामध्ये त्या संशयिताची चौकशी केली जात आहे. त्या संशयिताकडून काय काय माहिती मिळतेय ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Sanjay Raut : ‘सैफ अली खान मोदींच्या भेटीसाठी गेला होता म्हणून…’; संजय राऊतांचा खळबळजनक दावा