'मी सैफ अली खान आहे, लवकर स्ट्रेचर आणा', वेदनेने ओरडत असणाऱ्या अभिनेत्याची ऑटो चालकाने सांगितली 'त्या' रात्रीची कहाणी
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) वर त्याच्याच घरात घुसून चोरट्यानं जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तातडीनं लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तात्काळ सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या पोलिसांकडून सैफच्या आरोपीचा शोध सुरू आहे. इब्राहिमने आपल्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये ज्या रिक्षातून नेलं, त्या रिक्षा ड्रायव्हरने संपूर्ण घटनेचा घटनाक्रम सांगितला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या रिक्षा ड्रायव्हरने सांगितलं की, “सैफ अली खानच्या मानेला आणि पाठीला जखम झाली होती. मला माहितीच नव्हतं की, ते सैफ अली खान होते. मला फक्त इतकंच माहिती होतं की, कोणीतरी हा सामान्य व्यक्ती आहे आणि त्याच्या मानेला आणि पाठीला अनेक जखमा झालेल्या आहेत. आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा आमची हॉस्पिटलच्या सेक्युरिटीने आमची रिक्षा थांबवली. ते म्हणतात, इमर्जन्सी आहे. त्यामुळे मीही माझी रिक्षा थांबवली. तर तितक्यात तिथे हॉस्पिटलचे काही कर्मचारी वैगेरेही आले होते. त्यांनी सैफ यांना कंबरेला आणि खांद्याला पकडून हॉस्पिटलमध्ये नेलं. सैफ स्वत: चालत चालत रिक्षामध्ये बसले. त्यांच्यासोबत माझ्या रिक्षेत इब्राहिम, सैफ यांचा आणखी एक लहान मुलगा आणि एक वयस्क पुरुषही त्यांच्यासोबत होते.”
“मला तिथे करीना कपूर दिसल्या नाहीत. खरंतर, मला माहितीच नव्हतं की, माझ्या रिक्षेत कोण सेलिब्रिटी लोकं बसले आहेत. त्यांना जसं माझ्या रिक्षात बसवून नेलं, तसंच डायरेक्ट त्यांना मी हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यांच्या घरातून हॉस्पिटलमध्ये त्यांना पोहोचवायला मला फक्त ७ ते ८ मिनिटंच लागला, त्यांना मी शॉर्टकट रस्त्याने नेलं. सैफ यांनीमी इमरजेन्सी गेटजवळच नेऊन सोडलं. त्यानंतर सैफ स्वत: रिक्षातून खाली उतरले. मग त्यांना हॉस्पिटलच्या गेटवर आणण्यासाठी व्हिलचेअर आणली होती. त्यांच्या दोन्हीही मुलांच्या चेहऱ्यावर जास्त भिती नव्हते. सैफ यांचा कुर्ता अनेक ठिकाणी रक्ताने माखलेला होता. त्यांच्या मानेला आणि पाठीलाही जास्तप्रमाणात रक्त लागलेलं होतं.”
“त्यांचं रक्त माझ्या रिक्षाच्या सीटलाही लागलं होतं. त्यामुळे मी ते पुसून टाकलं होतं. सैफ आणि करिनाच्या घराजवळ एक हॉटेल आहे, तिथून मी येत होतो, तिथून येत असताना त्यांच्या बिल्डिंगच्या गेटवर एक महिला “रिक्षा- रिक्षा” म्हणून हाका मारत होती. म्हणून मी पटकन गेलो. तर त्यांनी मला लगेचच रिक्षा घेऊन आत बोलवलं. त्यानंतर सैफ यांच्यासह तिघांना मी घेवून मी हॉस्पिटलमध्ये गेलो. मी त्यांच्याकडे माझ्या रिक्षाचं भाडं मागितलं नाही, त्यांना मी म्हणालो की, तुम्ही यांच्यावर आधी उपचार करा आपण नंतर पैशांचा हिशोब पाहू. इतका मोठा सेलिब्रिटी माझ्या रिक्षात बसला हे ऐकून माझा आनंदाला पारावर उरला नाही. मला हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कळलं की, हे सैफ अली खान आहेत. पण, मी त्यांना सामान्य माणूसच समजत होतो. सैफ यांना हॉस्पिटलमध्ये मी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास पोहोचवलं.”