Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, “४ आणि ५ मे रोजी…”

कलाक्षेत्रातून पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया येत असताना आता बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानने पहलगाम हल्ल्यानंतर एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा निर्णय जाहीर केला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 28, 2025 | 05:04 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवार, २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अवघा देश हादरला आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या या घटनेचे अनेक हृदयद्रावक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे समोर येत आहेत. घटनेमध्ये २६ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांकडून सरकारने या हल्ल्याचा सरकारने बदला घेण्याची मागणी केली जात आहे. कलाक्षेत्रातून पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया येत असताना आता बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानने पहलगाम हल्ल्यानंतर एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा निर्णय जाहीर केला आहे.

“गर्दी दिसली की…”; पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंबंधित विशाखा सुभेदारची पोस्ट चर्चेत

काही तासांपूर्वी भाईजानने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर आगामी युके टूर संदर्भात एक पोस्ट शेअर केली. शेअर केलेल्या पोस्टमध्ये सलमानने लिहिलंय की, “काश्मीरमध्ये नुकतीच जी दुःखद घटना घडली ती डोळ्यासमोर ठेऊन आम्ही जड अंतःकरणाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या ४ आणि ५ मे रोजी मॅनचेस्टर आणि लंडनमध्ये होणारा ‘द बॉलीवुड बिग वन शो यूके’ हा कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. आमचे चाहते या शोची खूप वाट पाहत होते. परंतु सध्याच्या कठीण काळात हा शो पुढे ढकलणं हाच आमच्यासाठी उत्तम निर्णय आहे. तुम्हाला आमच्या निर्णयामुळे कोणत्याही प्रकारची असुविधा निर्माण झाली असेल तर आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. तुमचा पाठिंबा आणि समजुतदारपणा याची आम्हाला गरज आहे. या शोच्या नवीन तारखांची घोषणा लवकरच केली जाईल”

 

‘Raid 2’ वर सेन्सॉर बोर्डने चालवली कात्री, अजय देवगणचे आठ सेकंदांचे संवाद हटवले; बदलणार ‘हे’ शब्द!

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सलमानने अशा शब्दात पोस्ट लिहित त्याचा निर्णय जाहीर केलाय. देश दुःखात असताना सलमानने हा बिग बजेट शो स्थगित करण्याचा जो निर्णय घेतला, त्याचं सर्वच स्तरातून कौतुक केलंय. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशीच सलमानने हल्ल्यावर भाष्य केलं होतं. सलमान खानने त्याच्या X अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, “पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरला नरकात बदललं जात आहे. निर्दोष लोकांना लक्ष्य केलं जात आहे. एकाही निर्दोष व्यक्तीला मारणं हे संपूर्ण विश्वाला मारण्यासारखं आहे.”

Web Title: Salman khan postpones uk tour following pahalgam terror attack right to pause during this time of grief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 05:04 PM

Topics:  

  • Bollywood
  • pahalgam attack
  • Pahalgam Terrorist Attack
  • Salman Khan

संबंधित बातम्या

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!
1

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा  डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन
2

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!
3

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित
4

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.