देशभरात रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan 2023) सण उत्साहानं साजरा होतोय. बॉलिवूडमधील सेलिब्रिटीही आपल्या भावंडासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt) त्याच्या दोन्ही बहिणींसोबतचा एक फोटो शेअर करत रक्षाबंधनासाठी खास पोस्ट लिहिली आहे.
संजय दत्तने प्रिया दत्त आणि अंजू यांच्यासोबतचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘माझ्या प्रिय प्रिया आणि अंजू, या रक्षाबंधनाच्या दिवशी, तुमच्यावर असलेल्या नितांत प्रेमाची आणि आदराची मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो. ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या आधारस्तंभ आहात, त्याचप्रमाणे मी नेहमी तुमच्या पाठीशी उभं राहण्याचं वचन देतो. आपलं नाते शुद्ध आणि अतूट राहो. तुम्हाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!’
संजयनं शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या हातात राखी दिसत आहे. संजय दत्तच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
संजय दत्त हा लवकरच ‘घुडचडी’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय तो ‘द व्हर्जिन ट्री’मध्ये मौनी रॉय, पलक तिवारी आणि सनी सिंह यांच्यासोबत दिसणार आहे.
संजय दत्त हा त्याच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. संजयच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. संजयनं रॉकी,चल मेरे भाई,खलनायक, सडक,मुन्ना भाई एमबीबीएस या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच संजय दत्तनं डबल ISMART या चित्रपटात बिग बूल ही भूमिका साकारली. तसेच संजय हा लियो या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘लियो’ या सिनेमात संजय दत्तसह थलापती विजय, तृषा कृष्णन, अर्जुन सर्जा, मन्सूर अली खान, प्रिया आनंद हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.