वाढत्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी नियमित करा 'या' पद्धतीने करा सब्जाचे सेवन, जाणून घ्या योग्य वेळ
सब्जा खाण्याचे फायदे?
किती प्रमाणात सब्जा खावा?
उन्हाळ्यात शरीराची काळजी कशी घ्यावी?
राज्यासह संपूर्ण देशभरात उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. आपल्यातील अनेकांना उन्हाळा कंटाळवाणा वाटतो. उन्हात गेल्यानंतर शरीराला हानी पोहचते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराची खूप जास्त काळजी घ्यावी. कारण बाहेर जाऊन आल्यानंतर काहींना डोकेदुखीची समस्या उद्भवते तर कधी लघवीसंबंधित समस्या उद्भवतात. या दिवसांमध्ये शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते आणि शरीरात थकवा अशक्तपणा वाढतो. डिहायड्रेशन झाल्यानंतर कोणत्याही वेळी चक्कर येते. त्यामुळे उन्हाळ्यात भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. उन्हाळ्यामध्ये आहारात सब्जाचे सेवन करावे. सब्जा खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शिअम, मॅगनिज, मॅग्नेशिअम आणि फॉस्फरस इत्यादी अनेक घटक आढळून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढत्या उन्हाळ्यात सब्जाचे कशा पद्धतीने आणि किती प्रमाणात सेवन करावे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
रात्री झोपण्याआधी एक बॉटल पाण्यात अर्धा चमचा सब्जा भिजत ठेवावा. याशिवाय तुम्ही पाण्यात पुदिना किंवा इतर कोणतेही वेगळी फळे सुद्धा टाकू शकता. रात्रभर सब्जा पाण्यात व्यवस्थित फुलेल. त्यानंतर सकाळी उठल्यावर सब्जाचे सेवन करावे. सब्जाचे पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घाण बाहेर पडून जाते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामध्ये असलेले अँटी- ऑक्सिडंट आणि इतर घटक फ्री रेडिकल्सपासून संरक्षण करतात. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी सब्जाचे पाणी प्यावे. या पाण्याच्या सेवनामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
शरीर निरोगी ठेवण्यासाठी हृदयाचे कार्य सुरळीत चालू असणे फार महत्वाचे आहे. हृदयाच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा हृदयरोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे हृदयाचे कार्य सुरळीत चालू ठेवण्यासाठी नियमित एक ग्लासभर सब्जाचे पाणी प्यावे. सब्जा खाल्ल्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. यामध्ये असलेले ओमेगा -3 फॅटी अॅसिड, अल्फा-लिनोलेनिक अॅसिड हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवतात.
वाढत्या वयात हाडांमधील लवचिकता कमी होऊन जाते. हाडांमधील लवचिकता कमी झाल्यानंतर चालताना हातपाय दुखणे, गुडघे दुखणे, हात पाय दुखणे यांसारख्या बऱ्याच समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सब्जा बियांचे सेवन करावे. सब्जामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फॉस्फोरस इत्यादी अनेक घटक आढळून येतात. दैनंदिन आहारात कमीत कमी प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करत असलेल्या लोकांनी सब्जा बियांचे सेवन करावे.






