(फोटो सौजन्य: X)
काय दिसलं व्हिडिओत?
हा व्हायरल व्हिडिओ मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. धीमरखेडा तहसील अंतर्गत सदरच्या घनदाट जंगलात पाहिलेल्या दृश्यावर लोकांना विश्वास ठेवणे कठीण जात आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर, बरेच जण याला निसर्गाचा चमत्कार म्हणत आहेत, तर काही जण याला श्रद्धेचा चमत्कार म्हणत आहेत. लोकांचा असा विश्वास आहे की ही सामान्य घटना नाही, तर भगवान शिवाची कृपा आणि चमत्कार आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलं तर यात एक वाघ शंकराच्या पिंडिवर आपले डोकं टेकवताना दिसून येतो. जंगलाचा शिकारी शंकराच्या पिंडीचरणी आपले डोते टेकवत आहे हे पाहून यूजर्स थक्क झाले आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @last24hrofindia नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मला आशा आहे की ते एआयने बनवले नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “वाघाने असे काहीतरी करणे थोडेसे असामान्य आहे..” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “काही क्षण स्पष्टीकरणाच्या पलीकडे जातात. श्रद्धा आणि निसर्ग मिळून खरोखरच शक्तिशाली काहीतरी निर्माण करतात”.
Surprising scenes from MP Forest !! Tiger bowed its head before a sacred Shivling of Lord Shiva in MP’s Sadar Forest 🚩 pic.twitter.com/wmcpFpFd0Z — News Algebra (@NewsAlgebraIND) February 21, 2026
लग्नघरातच अंधार! वरात निघताच नवऱ्या मुलाच्या समोर लाइटमॅनने कापली इलेक्ट्रीसिटी, Video Viral
तथापि, व्हिडिओच्या दुसऱ्या बाजूविषयी बोलणं केलं तर वन विभाग आणि वन्यजीव तज्ञांचे म्हणणे आहे की वाघांमध्ये डोके घासणे ही एक सामान्य सवय आहे. ते त्यांच्या गालावर आणि कपाळावर असलेल्या सुगंधी ग्रंथींचा वापर करून प्रदेश चिन्हांकित करण्यासाठी झाडांवर, दगडांवर किंवा इतर पृष्ठभागावर डोके घासतात. प्रादेशिक वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी किंवा खाज सुटण्यासाठी हे वर्तन वापरले जाते. वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की हे धार्मिक श्रद्धेशी संबंधित नाही, तर वाघांसाठी एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. शिवाय, हे ठिकाण गावापासून फक्त ४०० मीटर अंतरावर असल्याने, त्यांनी स्थानिक रहिवाशांना सतर्क राहण्याचा आणि कोणताही अनुचित प्रकार टाळण्याचा सल्ला दिला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






