मोठ्या पडद्यावर अभिनयानं प्रेक्षकांना वेड लावल्यानंतर आता अनेक कलाकार ओटीटी विश्वाकडे (OTT Platform) वळत आहेत. रुपेरी पडद्याइतकंच ओटीटी प्लॅटफार्मवरी कॅान्टेट सिनेरसिकांना भावतोय. त्यामुळे अनेक कलाकार सध्या ओटीटी प्लॅटफार्मवरील चित्रपट, वेबसिरीजमध्ये अभिनय करण्याला महत्त्व देत आहेत. या यादीत करीना कपूर ते अजय देवगनपर्यंत बॅालिवूडमधील अनेक अभिनेते अभिनेत्रींचं नाव येतं. आता यावर्षी अनेक अभिनेत्री देखील ओटीटी विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत. या अभिनेत्रींमध्ये सारा अली खान (Sara Ali Khan), वाणी कपूर (vaani kapoor), उर्मिला मातोंडकर (urmila matondkar), अनुष्का शर्मा (amushka sharma), क्रिती सेनॅान (kriti senon) या अभिनेत्रींचा समावेश आहे.
[read_also content=”‘या’ दिवशी घरी बसल्या बघता येणार ‘महाराष्ट्र शाहीर’, वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर तारीख आली समोर! https://www.navarashtra.com/movies/maharahstra-shahir-world-television-premier-on-pravaj-picture-nrps-508158.html”]
सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची लेक सारा अली खानचा आगामी चित्रपट ‘ऐ वतन मेरे वतन’ 21 मार्च 2024 रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहे. या सिनेमातून मायलेकीला पुन्हा एकत्र अभिनय करताना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ‘प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे.
नुकताचं राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेली अभिनेत्री कृती सेनॅानच्या सिनेक्षेत्रात आता चांगली स्थिरावली आहे. तिचा आदीपुरुष सिनेमाला प्रेक्षकांनी नाकारल्यांतर आता तिचा ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ हा चित्रपट मोठ्या सिनेमातील चांगलाच गाजतोय. कृतीही आता ‘दो पत्ती’ या कलाकृतीच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी कृती सज्ज आहे. ती या सिनेमाची निर्मितीदेखील करत आहे. कृतीसह कालोजदेखील या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहे.
समंथा रुथ प्रभूने ‘सिटाडेल’ या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केलं आहे. समंथाची ही सीरिज प्राईम व्हिडीओवर 2024 मध्य रिलीज होऊ शकते. समंथासह या सीरिजमध्ये वरुण धवन मुख्य भूमिकेत आहेत. राज एंड डीके यांनी या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
अभिनय सोडून राजकारणाच्या वाटेवर गेलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काही दिवसांपासून मनोरंजनसृष्टीपासून दूर आहे. ‘तिवारी’ या वेबसीरिजच्या माध्यमातून कमबॅक करण्यासाठी आता ती सज्ज आहे. सौरभ वर्मा या सीरिजचं दिग्दर्शन करणार आहे. आई-मुलीच्या नात्यावर भाष्य करणारी ही सीरिज आहे.
प्रेगेन्सीच्या अफवानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री अनुष्का शर्माही आता ओटीटी विश्वात पदापर्ण करणार आहे. . आता चकदा एक्सप्रेस या सिनेमाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यासाठी अनुष्का शर्मा सज्ज आहे. क्रिकेटर झूलन गोस्वामी यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे.
मंडालाला मर्डर्स या सीरिजच्या माध्यमातून वाणी कपूर ओटीटीवर पदार्पण करणार आहे. गोपी पुथरन यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. यशराज फिल्म्सने या सीरिजची निर्मिती केली आहे.