झी मराठीवरील 'ही' प्रसिद्ध मालिका घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप
मालिका हा प्रेक्षकांच्या फार जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक वेगवेगळ्या वाहिन्यांवर वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका आपल्याला पाहायला मिळतात. लवकरच झी मराठीवर एक नवीन मालिका सुरू होणार आहे. ‘सावळ्याची जणू सावली’ असं त्या मालिकेचं नाव असून गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेच्या प्रोमोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. अद्याप ह्या मालिकेची रिलीज डेट समोर आलेली नाही. नवीन मालिका येणार असल्याने आता झी मराठीवरील एक जुनी मालिका लवकरच बंद होणार आहे.
लोकमत फिल्मीने दिलेल्या वृत्तानुसार, ‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या वर्षभरापासून ही मालिका प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करीत असून लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेची शुटिंग याच महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांत मालिकेमध्ये मोठ मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. मालिकेच्या कथानकात मोठ्या प्रमाणावर बदल झाल्यामुळे मालिकेला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी मालिकेत प्रमुख भूमिकेत असलेली खूशबू तावडे प्रेग्नेंट असल्यामुळे बाहेर पडली. तिच्याजागी मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेत्री पल्लवी वैद्य दिसत आहे. मालिकेचं शुटिंग सुरळीत सुरु असतानाच मालिका निरोप घेणार असल्याची माहिती मिळते. मालिकेत सध्या बरेच ट्वीस्ट्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. खोतांच्या घरात वाद आणि कट कारस्थान पाहायला मिळणार आहे. निशी सध्या मालिकेत प्रेग्नेंट आहे. निशीचं बाळ पाडण्याच्या प्रयत्नात मेघना आहे. निशी प्रेग्नेंट असल्याचे कळल्यापासूनच ती हे मुल पाडण्याचा कट रचत आहे. मेघनाचा हा प्लॅन सर्वांसमोर उघडकीस येणार का ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
शिवाय मालिकेत आता आणखी कोणकोणते ट्वीस्ट अनुभवायला मिळणार हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अद्याप नव्या मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली नसून वेळ सुद्धा कळलेली नाही.