(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
कियारा अडवाणी ही निःसंशयपणे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात अष्टपैलू आणि प्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे काम, अभिनय आणि इंडस्ट्रीतील तिचा प्रवास पाहून अनेक चाहते प्रेरित झाले आहेत. कियारा अडवाणी अनेक तरुण अभिनेत्रींसाठी प्रेरणास्त्रोत आहे. तसेच आता अभिनेत्री शर्वरी वाघ देखील या अभिनेत्रीच कौतुक करताना दिसली आहे.
बॉलिवूड मध्ये आपले स्थान कायम करू पाहणारी अभिनेत्री शर्वरी वाघ तिच्या हॉरर कॉमेडी मुंज्या मधील बेलाच्या भूमिकेसाठी आणि महाराज या चित्रपटातील विशेष भूमिकेसाठी चाहत्यांमध्ये पसंती मिळवली आहे. अलीकडेच अभिनेत्री शर्वरी वाघने एका मुलाखतीत कियारा अडवाणीबद्दल बरेच काही सांगितले आणि म्हणाली की, “मला खरोखरच कियारा अडवाणीचा प्रवास खूप प्रेरणादायी वाटतो, कारण मला वाटते की ती अशा चित्रपटांचा खूप काळ भाग असू शकते ज्यांना लोकांनी पाहिले नाही.” आणि आज ती टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.
अभिनेत्री पुढे पुढे म्हणाली, “मला वाटतं, दृढनिश्चय, मला खात्री आहे की तिला पुढे जावं लागेल आणि स्वत:ला अधिक चांगलं प्रदर्शन करावे लागेल. मला वाटतं की हे काहीतरी प्रेरणादायी ठरेल”. असे अभिनेत्रीने सांगितले.
कामाच्या आघाडीवर, अभिनेत्री कियारा अडवाणी गेम चेंजर, वॉर 2 आणि डॉन 3 या चित्रपटामध्ये दिसणार आहे आणि विकी कौशल पुढील बॅड न्यूझ आणि चावा या चित्रपटामधून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. तसेच अभिनेत्री तिच्या कारकिर्दीत खूप हुशार आणि यशस्वी अभिनेत्री आहे.
हे देखील वाचा- सान्या मल्होत्राने साडीला दिला मॉर्डन ट्विस्ट, अभिनेत्रीने शेअर केला सोशल मीडियावर फोटो!
शर्वरी वाघ ही एक आघाडीची अभिनेत्री असून, तिने अनेक हिंदी चित्रपटामध्ये काम केले आहे. परंतु ती आता मुंज्या आणि महाराजा या चित्रपटामधून प्रचंड चर्चेत आली आहे. तिच्या या दोन्ही चित्रपटामधील भूमिका पाहून प्रेक्षकांना ती आवडली आहे. यामुळे तिचा चाहता वर्ग देखील वाढलेला दिसून येत आहे. तसेच आता अभिनेत्री वेदा या चित्रपटामध्ये जॉन अब्राहमसह काम करताना दिसत आहे.