सौजन्य- सोशल मीडिया
सध्या टॉलिवूड अभिनेता नागा चैतन्य खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. समंथासोबत घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य काही महिन्यातच शोभिताला डेट करू लागला होता. शोभिताला डेट केल्यानंतर त्यांनी ८ ऑगस्टला गुपचूप साखरपूडा आटोपला. साखरपूड्यानंतर आता हे कपल लग्नामुळे चर्चेत आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपूर्वी हे कपल या वर्ष अखेर किंवा पुढच्या वर्षी लग्न करणार अशी चर्चा सुरू होती. अशातच आता या चर्चांदरम्यान सोशल मीडियावर वरातीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही व्हिडिओ पाहून अनेक चाहत्यांनी नागा चैतन्य आणि शोभिताने लग्न केलंय की काय ? अशी चर्चा सुरू आहे.
हे देखील वाचा – शर्वरी वाघ कियारा अडवाणीकडून झाली खूप प्रेरित, म्हणाली- ‘तिचा प्रवास प्रेरणादायी आहे’
सध्या इन्स्टाग्रामवर नागा चैतन्यने पूर्णपणे नवरदेवासारखाच लूक केलेला आहे. वरातीचा व्हिडिओ विरल भय्यानी या पापाराझीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला आहे. व्हायरल व्हिडिओत, रंगीबेरंगी फुलांनी सजलेल्या विंटेज कारमधून रॉयल एन्ट्री घेत असल्याचं दिसत आहे. यावेळी अभिनेत्याने ब्लॅक गॉगल, ऑफ व्हाईट कुर्ता आणि पायजमा आणि स्टायलिश शाल असा लूक अभिनेत्याने कॅरी केलेला दिसत आहे. व्हायरल व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक युजर्सने शोभिता आणि नागा चैतन्यने गुपचूप लग्न केलं आहे, अशी कमेंट केलेली आहे. सध्या वरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
शोभिता आणि नागा चैतन्यने गुपचूप लग्न केलेलं नाही. मंगळवारी झालेल्या एका ब्रँड इव्हेंटचा अभिनेता नागा चैतन्य हिस्सा झाला होता. त्यासाठी इतकी तयारी अभिनेत्याने केली होती. नागा चैतन्य एका नवरदेवाच्या अंदाजातच कार्यक्रमात सामील झाला होता. अभिनेता त्या इव्हेंटचा प्रमुख आतिथी होता. कार्यक्रमादरम्यान अभिनेत्याने मीडियासोबत लग्नाबाबत खुलासाही केला. लग्नाचे ठिकाण आणि इतर तपशील लवकरच मीडियाला सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, लग्नसमारंभ थाटामाटात साजरा करण्याऐवजी कुटुंब आणि जवळच्या लोकांसोबत साजरा करणे हे त्यांचे पहिले प्राधान्य आहे. यावरून स्पष्टपणे दिसून येते की नागा त्यांचे विवाह अगदी लहान प्रमाणात करू शकतात, ज्यामध्ये फक्त कुटुंबाचा सहभाग असतो.
हे देखील वाचा – ‘टायगर श्रॉफने मला कठोर परिश्रम करण्यास भाग पडले’ असं का म्हणाला सलमान खान!