Suhana Khan : लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणाऱ्या सुहाना खानला (Suhana Khan ) तिच्या डेब्यू चित्रपटापूर्वीच एक मोठी संधी मिळालेली आहे. एका मोठ्या मेकअप ब्रँडची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून सुहानाची निवड करण्यात आलेली आहे. त्या ब्रॅण्डच्या कार्यक्रमात सुहाना अतिशय सुंदर स्टाईलमध्ये पोहोचली होती.
शाहरुख खान आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना खान कधी तिच्या कामामुळे तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तुम्हाला कदाचित माहित असेल की सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती झोया अख्तरच्या नेटफ्लिक्स रिलीजमध्ये, खुशी कपूर, अगस्त्य नंदा आणि इतर अनेक स्टार्ससोबत दिसणार आहे. ‘द आर्चीज’ मध्ये दिसणार आहे. अजूनपर्यंत तरी या चित्रपटाची रिलीज डेट समोर आलेली नाही आणि त्याआधीच सुहाना खानला मोठी संधी मिळाली आहे. शाहरुख खानची लाडकी एका मोठ्या आणि आंतरराष्ट्रीय मेकअप ब्रँडची ब्रँड ॲम्बेसेडर बनली आहे. यावेळी सुहाना अतिशय सुंदर हॉट रेड लूकमध्ये पोहोचली आणि तिने सर्वांचे मन जिंकले.
शाहरुख खानची मुलगी सुहाना खानला तिच्या डेब्यू चित्रपटापूर्वीच एका मेकअप ब्रँडची ॲम्बेसेडर बनवण्यात आले आहे. जाणून घेऊया कोणत्या ब्रँडने या स्टारकिडला ही मोठी संधी दिली आहे. तर मेबेलाइन या मेकअप ब्रँडने सुहानाला ही संधी दिली आहे. सुहाना नुकतीच त्यांच्या लॉन्च इव्हेंटमध्ये दिसली होती.
या व्हिडिओमध्ये सुहाना खान मेबेलाइनच्या मंचावर कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे. या खास कार्यक्रमासाठी, अभिनेत्रीने लाल पँट आणि लाल क्रॉप टॉपचा सेट निवडला होता जो तिला खूप शोभून दिसत होता. या क्रॉप टॉप-पँटच्या सेटमधील अभिनेत्रीच्या फॉर्मल लूकने सर्वांनाच तिचे फॅन बनवले आहे. या व्हिडिओमध्ये सुहाना हसताना दिसत आहे, ज्यामध्ये सर्व चाहत्यांना शाहरुख खानची झलक दिसली आहे. लोक सुहानाला अतिशय शिष्ट आणि रुबाबदार मानतात. या व्हिडिओमध्ये त्याचा प्रत्यय येतोय असं म्हणायला हरकत नाही.