फोटो सौजन्य - सोशल मिडिया
अॅशेस मालिका सध्या सुरु आहे, या मालिकेचा आता शेवटचा सामना शिल्लक आहे. या मालिकेबद्दल सांगायचे झाले तर पहिल्या तीन सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने सामने जिंकून मालिका तर जिंकली आहेच पण ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या खेळाडूंच्या दुखापतीचे वृत अनेक समोर आले आहेत. त्याचबरोबर काही खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळत नाही आहे. मागील काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा याच्या निवृतीची वृत अनेक समोर येत आहेत.
डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर दोन वर्षांनी, उस्मान ख्वाजा देखील क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे वृत्त आहे. वॉर्नर आणि ख्वाजा बालपणीचे मित्र आहेत. जानेवारी २०२४ मध्ये डेव्हिड वॉर्नरने सिडनीमध्ये त्याच्या कसोटी कारकिर्दीतून निवृत्ती घेतली. आता, असे वृत्त आहे की उस्मान ख्वाजा सिडनीमध्ये त्याची शेवटची कसोटी देखील खेळू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उस्मान ख्वाजा सिडनी कसोटीनंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो.
उस्मान ख्वाजाच्या निवृत्तीबद्दल सुरू असलेल्या अफवांमध्ये, ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड म्हणतात की त्यांना याबद्दल कोणतीही माहिती नाही. मॅकडोनाल्डच्या मते, निवडकर्त्यांनी या संदर्भात काहीही संकेत दिलेले नाहीत. शिवाय, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांना उस्मान ख्वाजाकडून सिडनी कसोटीत खेळण्याची अपेक्षा आहे.
आता प्रश्न असा आहे की, अॅशेस मालिकेतील शेवटच्या कसोटीपूर्वी उस्मान ख्वाजाच्या कारकिर्दीबद्दल सस्पेन्स का आहे? सिडनी कसोटीनंतर उस्मान ख्वाजा निवृत्त होऊ शकतो अशा बातम्या अचानक का येत आहेत? या प्रश्नांमागील कारण ऑस्ट्रेलियाच्या कसोटी वेळापत्रकाशी संबंधित आहे. अॅशेस मालिकेच्या समाप्तीनंतर, ऑस्ट्रेलिया आठ महिन्यांत, पुढील वर्षी ऑगस्टमध्ये आपला पुढचा कसोटी सामना खेळेल. बांगलादेशविरुद्धच्या त्या कसोटी मालिकेपर्यंत, उस्मान ख्वाजा जवळजवळ ४० वर्षांचा असेल.
Usman Khawaja is expected to feature in the final #Ashes Test at the SCG, with no retirement discussions underway, says the Australia head coach 👇 pic.twitter.com/5BksKUl9T8 — Cricbuzz (@cricbuzz) December 29, 2025
सध्याच्या अॅशेस मालिकेत ख्वाजा प्लेइंग इलेव्हनमध्ये येत-जातत आहे . पुढील वर्षी ऑगस्टमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेपर्यंत निवडकर्त्यांना त्याच्यावर किती विश्वास असेल हे सांगणे कठीण आहे.
इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या अॅशेस मालिकेत उस्मान ख्वाजाच्या कामगिरीमुळे त्याने पाच डावांमध्ये ३०.६० च्या सरासरीने १५३ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये फक्त एक अर्धशतक आहे.






