या मंदिराची खासियत म्हणजे निसर्गाच्या कुशीत वेढलेलं हे मंदिर जितकं मन वेधून घेतं तितकंच ते गूढ वाटतं. या मंदिराला झाडाझुडुपांनी वेढलेलं आहे. या ठिकाणी जाण्यासाठी चक्क पाण्यातून वाट काढत जावं लागतं. सिंधुदुर्गपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेलं हे प्राचीन शिवमंदिर चहू बाजूने पाण्याने वेढलेले आहे. मंदिरातील दगडाने बनवलेलं शिवलिंग आहे. मात्र याचं वेगळेपण म्हणजे हे पंचमुखी शिवलिंग असल्याचं सांगितलं जातं. मंदिराच्या चारही बाजूंना पाणी असलं तरी या पाण्याचा तळ दिसावा इतकं नितळ पाण्याता ओढा या ठिकाणी आहे. याबाबतची सविस्तर माहिती साहिल देसाई या इन्स्टाग्रामवरुन सांगितली.
या मंदिराच्या दिशेने येताच सगळ्यात आधी गणपतीचं मंदिर लागतं. कौलारु मंदिर, लाल मातीने वेढलेला निसर्ग या सगळ्याने मन वेधून घेतं. कुणकेश्वरला आल्यानंतर अनेक भाविक आणि पर्यटक या ठिकाणाला भेट देण्यासाठी येतात. कुणकेश्वर असो किंवा सिंधुदुर्गमधील हे प्राचीन मंदिर म्हणजे निसर्गाने कोकणाला दिलेलं देणं आहे. समुद्राची गाज, नारळी पोफळीच्या बागा यांबरोबरच कोकणातील देवकथा देखील तितक्याच प्रसिद्ध आहे. जर तुम्ही सुद्धा कुणकेश्वरला गेलात तर हे प्रचीन मंदिर पाहाय़ला विसरु नका.
Ans: हे प्राचीन शिवमंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यात, प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिराजवळ असून सिंधुदुर्गपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर आहे.
Ans: हे मंदिर अत्यंत प्राचीन असून निसर्गाच्या कुशीत, झाडाझुडुपांनी वेढलेले आहे. मंदिरात असलेले पंचमुखी शिवलिंग ही याची प्रमुख खासियत मानली जाते.
Ans: या मंदिराकडे जाण्यासाठी चक्क पाण्यातून वाट काढत जावे लागते. मंदिर चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले असून नितळ पाण्याचा ओढा या ठिकाणी आहे.






