काही दिवसापासून अभिनेता श्रेयस तळपदे चर्चेत आहे. काही दिवसापुर्वी त्याला हृदय विकाराचा झटका आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. डॅाक्टारांच्या सल्ल्यानुसार तो आराम करत होता. तेव्हापासून श्रेयस मनोरजंनपासून दूर होता. फॅन्सही त्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यास उत्सुक होते. आता श्रेयसच्या चाहत्यांसाठी एक आंनदाची बातमी आहे. आजारपणातून बाहेर आल्यानंतर श्रेयस आता प्रेक्षकांना भेटण्यास सज्ज आहे. तो आता एकाव्या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
[read_also content=”सिनेसृष्टी गाजवल्यानंतर आता थलापती विजय गाजवणार राजकारण, ‘तमिळगा वेत्री काझम’ पक्ष स्थापन करत राजकारणात एन्ट्री! https://www.navarashtra.com/movies/tamil-actor-thalapathy-vijay-announces-political-party-names-it-tamilaga-vettri-kazhagam-nrps-504009.html”]
महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) मुव्हिज आणि झी स्टुडिओज निर्मित, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ (Hi Anokhi Gath) या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. यात श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि गौरी इंगवले (Gauri Ingawale) यांच्या प्रमुख भूमिकेत आहेत.
अभिनेता श्रेयस तळपदेने पोस्ट शेअर करत ‘ही अनोखी गाठ’ या सिनेमाची घोषणा केली आहे. सिनेमाचं पोस्टर शेअर करत श्रेयसने लिहिलं आहे,”नव्या वर्षाची सुरुवात एका नव्या कोऱ्या मराठी सिनेमाने.. झी स्टुडिओज प्रस्तुत करीत आहेत, महेश मांजरेकर दिग्दर्शित एक नवी प्रेम कहाणी ‘ही अनोखी गाठ’. 1 मार्च 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित’.