Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shreyas Talpade Upcoming Movie: असुर कितीही असले तरी विजयासाठी एकच “मर्दिनी” पुरेशी असते, श्रेयस तळपदेच्या नव्या चित्रपटाची घोषणा

श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. धैर्य, जिद्द आणि सामर्थ्याच्या अदम्य प्रवासाची प्रेरणादायी गाथा आता मोठ्या पडद्यावर !!

  • By अमृता यादव
Updated On: Oct 06, 2025 | 05:06 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

Shreyas Talpade Upcoming Movie : मराठमोळा अभिनेता श्रे‌यस तळपदेचा “मर्दिनी” चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्रे‌यस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. सादर करीत आहेत अशी कथा जी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याला, तिच्या सहनशीलतेला आणि तिच्या अदम्य धैर्याला उजाळा देणारी आहे. काळ कितीही बदलला, असुरांचे कितीही सावट पसरले, तरीही इतिहासाने वेळोवेळी दाखवून दिले आहे की एका मर्दिनीचे धैर्य, तिची जिद्द आणि तिचा प्रखर संकल्प हाच अन्याय, दुष्टता आणि अंधार यांवर मात करण्यासाठी पुरेसा ठरतो.

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाची नांदी संपन्न झाली. हा चित्रपट प्रत्येक स्त्रीमध्ये असलेल्या सुप्त शक्तीचे दर्शन घडवणार आहे. “असू देत लाख महिषासुर… पुरे आहे फक्त एक ‘मर्दिनी’ या संकल्पनेवर आधारित असलेला हा चित्रपट समाजातील वाईटाच्या विरोधात उभारा घेणाऱ्या एका सामान्य स्त्रीच्या अलौकिक शौर्याची गोष्ट सांगेल.

संजय कपूरच्या बहिणीचा गंभीर आरोप म्हणाली, ”करिश्मा कपूरचा संसार उद्ध्वस्त..”

निर्माते श्रेयस तळपदे यांनी यावेळी सांगितले “प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी वेगळं देण्याची परंपरा ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स ने कायम ठेवली आहे. पोस्टर बॉईज, बाजी आणि सनई चौघडे यांसारख्या अनेक चित्रपटांमधून मिळालेलं प्रेक्षकांचं अपार प्रेम या बॅनरच्या नावाला अधिकच उजाळा देतं. गुणवंतांना सदैव प्राधान्य देणाऱ्या या बॅनरने सई ताम्हणकर, तृप्ती डिंमरी, अनिता दाते यांसारख्या अनेक कलाकारांना तसेच कॅमेरामॅन आणि दिग्दर्शकांना प्रकाशझोतात आणलं आहे. आता ‘मर्दिनी’ या सिनेमाच्या निमित्ताने अजय मयेकर दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदाच या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. हा त्यांचा पहिला दिग्दर्शकीय चित्रपट ठरणार असून लवकरच या चित्रपटाचं भव्य चित्रिकरण सुरु होणार आहे. ‘मर्दिनी’ हा केवळ एक चित्रपट नसून प्रत्येक स्त्रीमध्ये दडलेल्या अंतर्गत शक्तीला साजरा करणारा एक उत्सव आहे. आशा आहे कि या सिनेमाला सुद्धा प्रेक्षक प्रेम देतील. ”

स्त्रीशक्तीचा उत्सव होणार साजरा, “लग्न आणि बरंच काही” चित्रपटातून दिसणार ‘महिलाराज’!

चित्रपटाबद्दलची संपूर्ण माहिती, कलाकारांची निवड आणि इतर तपशील लवकरच जाहीर केले जातील. श्रे‌यस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. ची भव्य निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या २०२६ साली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Shreyas talpades new film announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 04:59 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi movie
  • shreyas talpade

संबंधित बातम्या

‘मन धावतंया’ गायिका राधिका भिडेचं ‘उत्तर’ चित्रपटामधून पदार्पण, “हो आई!” गाण्याला दिला आवाज
1

‘मन धावतंया’ गायिका राधिका भिडेचं ‘उत्तर’ चित्रपटामधून पदार्पण, “हो आई!” गाण्याला दिला आवाज

एक बहुआयामी व्यक्तीमत्व; चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
2

एक बहुआयामी व्यक्तीमत्व; चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

‘जिप्सी’ विशेष प्रदर्शन गाजलं! प्रेक्षकांनी दिला भरभरून प्रतिसाद; प्रशांत साजणीकरांची मुलाखत चर्चेत
3

‘जिप्सी’ विशेष प्रदर्शन गाजलं! प्रेक्षकांनी दिला भरभरून प्रतिसाद; प्रशांत साजणीकरांची मुलाखत चर्चेत

फिरसत्या देवाचा कोप अन् रहस्यमयी, गूढ कहाणी; ‘असुरवन’ चित्रपटाचा शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चा
4

फिरसत्या देवाचा कोप अन् रहस्यमयी, गूढ कहाणी; ‘असुरवन’ चित्रपटाचा शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.