गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या (Sonalee Kulkarni) शाही विवाहसोहळ्याची चर्चा सुरु होती. सोनाली आणि कुणाल (Sonalee And Kunal Marriage) यांनी २०२१ मध्ये दुबईमध्ये रजिस्टर लग्न केलं होतं. पण त्यांनी लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी पुन्हा लंडनमध्ये मराठमोळ्या पद्धतीने विधीवत लग्नगाठ बांधली. सोनालीच्या लग्न सोहळ्याच्या व्हिडिओंची मालिका नुकतीच प्लॅनेट मराठी ओटीटीवर (Planet Marathi OTT) रिलीज झाली आहे. यातील एका व्हिडिओमध्ये सोनाली कुलकर्णीने तिच्या प्रपोजचा मजेदार किस्सा सांगितला.
सोनाली म्हणाली, “माझी आणि कुणालची भेट २०१७ मध्ये काही कॉमन फ्रेंड्समुळे झाली. आम्ही पहिल्यांदा ऑनलाइन भेटलो होतो. चॅटवर बोलायला सुरुवात झाली. एकमेकांबद्दल जाणून घेता घेता आमची मैत्री झाली. त्यानंतर आम्ही पहिल्यांदा लंडनमध्ये भेटलो. मी एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेले होते. मग तो दुबईमध्ये शिफ्ट झाला. आमच्या भेटी वाढल्या.”
सोनाली पुढे सांगते, “ दोन वर्षांनंतर मी त्याला भेटल्यावर मी म्हणाले की या भेटीनंतर जर का तू पुढे काही ऑफिशियल केलं नाही तर माझे आई-वडील मला तुला भेटायला पाठवणार नाहीत. आमच्या भेटीची शेवटची संध्याकाळ होती तेव्हा तो मला दुबईच्या सगळ्यात उंच ठिकाणी घेऊन गेला. आम्ही एक झीप लाइन रोलर कोस्टर राइड केली. सुंदर संध्याकाळी तो मला प्रोपज करणार असं मला वाटत होतं. मी त्याची आतुरतेनं वाट पाहत होते. पण काहीच घडलं नाही.”
[read_also content=”आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे जगभरात सेलिब्रेशन, यावर्षीची थीम जाणून घ्या https://www.navarashtra.com/lifestyle/international-youth-day-2022-theme-and-history-of-the-day-nrsr-315136/”]
कुणालच्या प्रपोजबद्दल सांगताना सोनाली म्हणाली, “दुसऱ्या दिवशी माझी फ्लाइट होती. सकाळी नाराज होऊन मी त्याला मला एअरपोर्टला सोडायला सांगितलं. मी लिफ्टपाशी उभी होते. अचानक कुणालने मला हाक मारली आणि तू काही विसरत तर नाहीयेस ना? असं म्हणाला. मला त्याने पुन्हा आता बोलावलं आणि माझ्या आवडीचं गाणं लावलं. त्याने मला त्यावेळी तिथेच प्रपोज केलं. यावर माझं म्हणणं असं होतं की तू हे काल का नाही केलं. त्यावर तो मला म्हणला की मी कालच तुला प्रपोज करणार होतो पण मी त्यावेळी अंगठी विसरलो होतो.”






