"नॉनव्हेज सोडलं, हॉटेलमधलं पाणीही...", सीतेच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्रीने स्वतःवर लावलेले निर्बंध
गेल्या काही दिवसांपासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे टॉलिवूड अभिनेत्री नयनतारा चर्चेत आहे. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री नयनताराचा नेटफ्लिक्सवर ‘नयनतारा- बियॉन्ड अ फेयरीटेल’ नावाची डॉक्युमेंट्री सध्या चर्चेत आहे. नयनताराने या डॉक्युमेंट्रीमध्ये तिच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. दरम्यान, नयनताराचा २०११ मध्ये ‘श्री रामा राज्यम’ नावाचा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटासाठी अभिनेत्रीने खूप मेहनत घेतली आहे.
स्वादिष्ट ‘जिलबी’च्या पाठीमागे हत्येचं गुढ, विचारात टाकणारं मोशन पोस्टर रिलीज
नेटफ्लिक्सवर ‘नयनतारा- बियॉन्ड अ फेयरीटेल’ नावाची रिलीज झालेल्या डॉक्युमेंट्रीमध्ये अभिनेत्रीने विशेष मेहनत घेतली होती. या चित्रपटात तिने सीतेची भूमिका साकारली होती. सीतेच्या भूमिकेसाठी नयनताराने नॉनव्हेज सोडल्याचे सांगितले आहे. जाणून घेऊया तिने सीतामातेच्या भूमिकेसाठी कशा पद्धतीने मेहनत घेतली आहे. डॉक्युमेंट्रीमध्ये नयनताराच्या एका टीममेंबरने सांगितले की, “नयनताराने ‘श्री रामा राज्यम’ चित्रपटातील भूमिका साकारताना नॉनव्हेज खाणं बंद केलं होतं. शुटिंगवेळी अभिनेत्री हॉटेल ताज कृष्णामध्ये राहत होती. संपूर्ण शुटिंगमध्ये अभिनेत्री हॉटेलचं साधं पाणीही प्यायली नव्हती.”
तब्बल ३२ तासांचा प्रवास करून गिरीजा ओकने बजावला मतदानाचा हक्क, नागरिकांना दिला मोलाचा सल्ला
“त्यावेळी तिच्यासाठी दररोज शाकाहरी जेवण बाहेरून यायचं. भूमिकेचं पावित्र्य राखण्यासाठी नयनताराने स्वत:साठी अनेक कडक नियम आखले होते. शिवाय तिने स्वत:च्या दिनक्रमातही मोठा बदल केला होता.” या चित्रपटानंतर नयनतारा फिल्म इंडस्ट्री सोडणार अशी चर्चा सुरू होती. त्यावेळी, नयनताराचं वैयक्तिक आयुष्य वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. त्यामुळे लोकांनी तिच्यावर टीकेचा भडीमार केला होता. सर्वांच्या नाराजीला कंटाळून नयनतारा फिल्म इंडस्ट्री सोडणार होती. वैयक्तिक आयुष्यामध्ये प्रचंड उलथापालथ सुरु असताना २०११-१२ मध्ये अभिनेत्रीने ब्रेक घेतला. पुढे जुनं सर्व विसरुन नयनतारा पुन्हा एकदा इंडस्ट्री गाजवायला सज्ज झाली.