जर तुम्हाला मराठी आणि हिंदी चित्रपट बघायला आवडत असतील तर ३१ मे सिनेमा लव्हर्स डे हा खास तुमच्यासाठी बनवण्यात आला आहे. कारण तुमच्यासाठीच ३१ मे ला मल्टिप्लेक्स एसोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे एमआय यांनी चित्रपटगृहात कोणत्याही सिनेमाची तिकीट ही फक्त ९९ रुपयाला ठेवली आहे. तुम्हाला आताच रिलीज झालेला सिनेमा पाहता येईल. ही ऑफर फक्त ३१ मे ला पर्यादित आहे. त्यामुळे या संधीचा चित्रपटगृहात जाऊन चांगला लाख घ्या.
यावर्षी हिंदी तसेच इतर भाषेमधील चित्रपटांना जास्त यश मिळाले नाही त्यामुळे हि ऑफर सुरु करण्यात आली आहे. बॉलीवूडमधील कमी किमतीतील तिकिटांचा दर वाढण्यात आला होता. पण यावेळी सिनेमा लव्हर्स डे हा ४ हजार चित्रपटगृहात साजरा केला जाणार आहे. ज्यामध्ये PVR-INOX, CINEPOLIS, MIRAJ, CITYPRIDE, ASIAN, MUKTA A2, MOVIE TIME, MOVIEMAX, WAVE, M2K, DELITE यांसारख्या चित्रपटगृहांचा समावेश आहे. तुम्ही तुमची या वेबसाईटवर टिकट्स बुक करू शकता.

नक्की चित्रपटगृहात कोणते सिनेमा पाहायला मिळणार हा प्रश्न तुम्हाला पण असेल तर त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्यामध्ये चित्रपटाची वेळ, चित्रपटाचे नाव हे सगळं तुम्हाला तिथे समजेल. आनंदाची बातमी तर ही आहे की चित्रपटगृहात धर्मा प्रोडकेशन्स ची ‘मिस्टर एंड मिसेज माही’ हा नवाकोरा चित्रपटसुद्धा तुम्हाला ९९ मध्ये उपलब्ध होऊन जाईल.






