लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमांच्या दिवशी महिला साडी नेसण्यास प्रथम प्राधान्य देतात. साडीमुळे लुक रॉयल आणि उठावदार दिसतो. फॅशनच्या युगात साडी आणि साडीच्या कापडामध्ये असंख्य बदल झाले आहेत. बाजारात अनेक वेगवेगळ्या फॅब्रिकच्या आणि डिझाईनचे साड्या उपलब्ध आहेत. पण तरीसुद्धा महिलांना कायमच हातमागावर विणलेल्या सिल्क साड्या परिधान करायला खूप जास्त आवडते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही साड्यांबद्दल सांगणार आहोत, ज्या फॅशनच्या युगातही ट्रेंडिंगला आहेत. चला तर पाहुयात कोणत्या आहेत या साड्या. (फोटो सौजन्य – pinterest)
फॅशन युगात हातमागावरील 'या' साड्या कधीच होणार नाहीत जुन्या, पहा रॉयल लुक दिसणाऱ्या सुंदर साड्या

कोणत्याही कार्यक्रमात प्रत्येक महिलेला कायमच रॉयल, एलिंगट दिसायचे असते. अशावेळी बनारसी साडीची निवड करू शकता. बारीक नक्षीकाम, रेशमी धाग्यांचा वापर आणि शाही लुक देणाऱ्या साड्या कोणत्याही महिलेवर अतिशय सुंदर दिसतात. लाल, मरुन, हिरवा आणि सोनेरी रंग सगळीकडे लोकप्रिय आहे.

दक्षिण भारतासह जगभरात सगळीकडे कांजीवरम सिल्क साडीला खूप मोठी मागणी आहे. अस्सल सिल्क साडी नेसल्यानंतर लुक रॉयल दिसतो. कांजीवरम सिल्क साडीला हेवी काठ असतात.

महाराष्ट्राचे महावस्त्र म्हणून जगभरात सगळीकडे पैठणी साडीची ओळख आहे. साडीवरील मोर, बारीक नक्षीकाम, अस्सल धाग्यांचा वापर करून विणलेली साडी राजेशाही लुक देते.

काहींना जास्त जड किंवा जास्त भरलेल्या साड्या नेसायला अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्ही चंदेरी कतान सिल्क साडीची निवड करू शकता. ही साडी सिल्क आणि कॉटनच्या मिश्रणातून तयार केली जाते.

वजनाने अतिशय हलकी आणि सहज नेसता येईल अशी कॉटन साडी सर्वच महिलांना खूप जास्त आवडते. प्रवासात किंवा गर्दीच्या ठिकाणी जायचे असल्यास कॉटन साडी परिधान करावी.






