Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठसकेबाज लावणीने अवघ्या महाराष्ट्राला घायाळ करणारी गौतमी पाटील आता स्वयंपाकाचे धडे देणार; कधी आणि कुठे ? वाचा सविस्तर

‘सबसे कातील गौतमी पाटील’ म्हणून अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या गौतमी पाटीलने आपल्या ठसकेबाज लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. आता ही नृत्यांगना छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 09, 2025 | 07:32 PM
ठसकेबाज लावणीने अवघ्या महाराष्ट्राला घायाळ करणारी गौतमी पाटील आता स्वयंपाकाचे धडे देणार; कधी आणि कुठे ? वाचा सविस्तर

ठसकेबाज लावणीने अवघ्या महाराष्ट्राला घायाळ करणारी गौतमी पाटील आता स्वयंपाकाचे धडे देणार; कधी आणि कुठे ? वाचा सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

‘सबसे कातील गौतमी पाटील’ म्हणून अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या गौतमी पाटीलने आपल्या ठसकेबाज लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. आता ही नृत्यांगना छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या २६ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमात गौतमी पाटीलसुद्धा सहभागी होत आहे. गौतमीचं नृत्यकौशल्य संपूर्ण महाराष्ट्र अनुभवतच आहे. ‘शिट्टी वाजली रे’या कार्यक्रमातून गौतमीचं पाककौशल्य अवघ्या महाराष्ट्राला आता पाहायला मिळणार आहे.

घर बंद तरीही कंगना रणौतला आलं एक लाख रुपये वीज बिल; अभिनेत्री हिमाचल प्रदेश सरकारवर संतापली…

गौतमी पाटीलने आपल्या ठसकेबाज लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. सबसे कातील अशी ही नृत्यांगना आता छोटा पडदा गाजवण्यासाठीही सज्ज झाली आहे. ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. गौतमीचे नृत्यकौशल्य संपूर्ण महाराष्ट्र अनुभवतच आहे. कार्यक्रमातून गौतमीचे पाककौशल्य पाहायला मिळणार आहे.

कार्यक्रमाविषयी गौतमी सांगते, ” ‘स्टार प्रवाह वहिनी माझ्या अत्यंत जवळची आहे. या वाहिनीने मला नवी ओळख मिळवून दिलीय. अल्पवाधितच या परिवाराने मला आपलसं करून घेतलं आहे. ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमातून माझं टीव्ही विश्वात पदार्पण होतंय असं म्हंटलं तरी चालेल. खरं सांगायचं तर मला जेवण बनवता येत नाही. त्यामुळे हा कार्यक्रम माझ्यासाठी नवा प्रयोग असणार आहे. त्यामुळे नवनव्या कलाकारांसोबत माझी स्वयंपाक घराशी नव्याने ओळख होणार आहे.” अशी भावना गौतमीने व्यक्त केली.

बाबांच्या वाढदिवसानिमित्त समृद्धी केळकरची स्पेशल पोस्ट, म्हणाली, “कुठेही कधीही डुलकी…”

कार्यक्रमाचं वेगळेपण म्हणजे या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांना पदार्थ बनवण्याचा टास्क दिला जाणार आहे. मात्र तो पदार्थ बनवताना कलाकारांची कशी तारांबळ उडते हे पहाणे मजेशीर ठरणार आहे. कारण कलाकारांचे कलाकौशल्य आपण मालिका, नाटक आणि सिनेमांमधून पहातच असतो. मात्र त्यांचे आजवर कधीही न पाहिलेले पाककौशल्य शिट्टी वाजली रे च्या मंचावरून पहिल्यांदा महाराष्ट्रासमोर येणार आहे. सहजरित्या आपल्या अभिनयाने आणि नृत्याने मने जिंकणारे हे कलाकार स्वयंपाकात खरंच कुशल आहेत का याची पोलखोल हा मंच करणार आहे. थोडक्यात काय पोटभर खायला घालणारी नाही तर स्वयंपाक करता करता पोटभर हसवणाऱ्या कलाकार जोडीचा शोध हा कार्यक्रम घेणार आहे. लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ हा कार्यक्रम होस्ट करणार असून पूर्णब्रह्म या मराठी रेस्टॉरंटच्या संचालिका जयंती कठाळे सेलिब्रिटी शेफची भूमिका पार पाडतील. २६ एप्रिल पासून रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर हा शो सुरु करण्यात येणार आहे.

Web Title: Star pravah new show shitti vajali re gautami patil first reaction on television debut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 07:32 PM

Topics:  

  • Gautami patil
  • marathi actress
  • star pravah
  • star pravah serial
  • Television Actress

संबंधित बातम्या

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ
1

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ

‘हाथी घोडा पालकी, बर्थडे कन्हैया लाल की’ स्टार प्लसचा जन्माष्टमी विशेष सोहळा आणि समृद्धी शुक्लाची भावनिक आठवण
2

‘हाथी घोडा पालकी, बर्थडे कन्हैया लाल की’ स्टार प्लसचा जन्माष्टमी विशेष सोहळा आणि समृद्धी शुक्लाची भावनिक आठवण

“आई बापाला जिवंत गाडलं तिथं मुलीचं काय ?”अजय पूरकर दिसणार नव्या भूमिकेत ; स्टार प्रवाहवर येतेय नवी मालिका, पाहा प्रोमो
3

“आई बापाला जिवंत गाडलं तिथं मुलीचं काय ?”अजय पूरकर दिसणार नव्या भूमिकेत ; स्टार प्रवाहवर येतेय नवी मालिका, पाहा प्रोमो

मालिकेतील येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ताच्या साडीवर कोरले तिच्या ‘अहों’चे नाव
4

मालिकेतील येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ताच्या साडीवर कोरले तिच्या ‘अहों’चे नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.