kangana ranaut bjp mp mandi shares her political journey experiences and future aspirations
बॉलिवूडची ‘पंगा गर्ल’ आणि मंडी लोकसभेची खासदार कंगना रणौत कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. काल पंतप्रधान मोदींवर गौरवोद्गार केल्यानंतर आता अभिनेत्री एका नव्या प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री मुळची हिमाचल प्रदेशची आहे. तिचं घर मनाली येथे आहे. अभिनेत्रीच्या मनालीच्या घरी कोणीही राहत नाही. पण तरीही अभिनेत्रीला लाखो रुपयांचं बिल आलं आहे. घर बंद असतानाही आलेलं बिल पाहून अभिनेत्रीला धक्का बसला आहे. यावरून अभिनेत्री आता हिमाचल प्रदेश सरकारावर चांगलीच संतापली आहे.
बाबांच्या वाढदिवसानिमित्त समृद्धी केळकरची स्पेशल पोस्ट, म्हणाली, “कुठेही कधीही डुलकी…”
सध्या हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेसचे सरकार आहे. तिने कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारवर चांगलेच टीकास्त्र सोडले आहे. अभिनेत्रीने, मनालीमधल्या घराचं वीज बिल तब्बल एक लाख रुपये आल्याचा आरोप केला आहे. हा आरोप तिने एका राजकीय कार्यक्रमादरम्यान केला आहे. अभिनेत्री हिमाचल प्रदेश सरकारवर टीका करताना म्हणाली की, “या महिन्यामध्ये शहराची अत्यंत दुर्दशा झाली आहे. माझ्या मनालीतल्या घराचं वीज बिल या महिन्यात एक लाख रुपये आले आहे. तिथे मी राहत नाही, पण तरीही इतकं बिल आहे. अशी या शहराची बिकट अवस्था झाली आहे. आपण वाचतो आणि लाज वाटते की हे काय होतंय”, असं अभिनेत्री भाषणात म्हटली.
भाषणावेळी अभिनेत्री पुढे म्हणाली की, “पण आपल्याकडे एक संधी आहे. तुम्ही सर्वजण जे मला माझ्या भावाबहिणींसारखे आहेत, तुम्ही ग्राऊंड लेव्हलला इतकं काम करता. हे आपल्या सर्वांचं दायित्व आहे की आपल्याला या देशाला, या प्रदेशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जायचंय. मी तर म्हणेन की हे सर्वजण लांडगे आहेत आणि आपल्याला त्यांच्या तावडीतून बाहेर पडायचं आहे.”
There is a wave of PM Modi in the entire country and saffron but it is painful to watch Himachal Pradesh’s condition. The electricity bill of Rs 1 lakh came for my house in Manali..I don’t even live there : Kangana Ranaut #HimachalPradesh #KanganaRanaut pic.twitter.com/Z1rVSbQoi1
— Rahul Chauhan (@RahulCh9290) April 8, 2025
वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘फुले’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली, नेमकं कारण काय?
कंगना रणौतने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये, हिमाचल प्रदेशातल्या मंडी लोकसभेतून निवडणूकीसाठी उभी राहिली होती. कंगनाने ही निवडणूक पहिल्यांदाच लढवली होती. त्यामध्ये तिचा विजय झाला होता. अभिनेत्रीने निवडणूकीच्या काही दिवस आधीच भाजपामध्ये प्रवेश केला होता. तिने भाजपाच्या तिकिटावर ही निवडणूक लढली होती. गेल्या काही दिवसांपूर्वीच कंगना रणौतचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘इमर्जन्सी’ चित्रपट रिलीज झाला होता. त्या चित्रपटामध्ये अभिनेत्री स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. कंगणाच्या ह्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता अभिनेत्री अभिनेता आर. माधवनबरोबरच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे तिच्या या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.