Samruddhi Kelkar Shared Special Post For Father On his Birthday
‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या ‘फुलाला सुगंध मातीचा’मालिकेतून अभिनेत्री समृद्धी केळकर (Samruddhi Kelkar) महाराष्ट्रातल्या घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये तिने साकारलेली ‘किर्ती’ची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. याशिवाय ‘ढोलकीच्या तालावर’ या शोमध्ये तसेच ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत सुद्धा समृद्धीने महत्त्वाची भूमिका साकारली होती. आपल्या सहज-सुंदर अभिनयाने समृद्धी रसिक प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या समृद्धीने आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट लिहिली आहे. समृद्धीने वडिलांसोबतचा खास फोटो शेअर करत भली मोठी पोस्ट लिहिली आहे.
वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘फुले’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली, नेमकं कारण काय?
अभिनेत्री समृद्धी केळकरने वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पोस्टमध्ये लिहिलंय की, “बाबा
माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची, लाडकी , प्रेमळ ,खंबीर व्यक्ती… स्वप्न पूर्ण करताना आपली माणसं आपल्यासोबत असली की आपला मार्ग सोपा होतो… आज मी जे काही आहे ते फक्त या व्यक्तीमुळे. आई नंतर दुःख बाजूला सारून खंबीरपणे आई आणि बाबा असं दोन्ही होऊन आम्हा मुलींना फार लाडात वाढवलं आणि आजही आमचं आणि नातवांचं तेवढंच सगळं प्रेमाने करतात. कायम प्रोत्साहन देणारे, शूटिंगला जाताना डबा भरून देणारे, पोहोचलीस का जेवलीस का म्हणून सारखे फोन करणारे, वेळेप्रसंगी कठोर होणारे, चहा प्रेमी, माझा फसलेला पदार्थ तक्रार न करता मिटक्या मारत खाणारे, फोन कमी वापर म्हणून लेक्चर देणारे, कुठेही कधीही डुलकी काढण्याचं कौशल्य असणारे, दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा हास्यजत्रेची पारायणं करणारे, मी केलेल्या कामाचे भाग परत परत बघणारे, कौतुक करणारे असे हे माझे बाबा… जगात मी कोणाला (आदरयुक्त) घाबरत असेन तर फक्त यांनाच… भांडणाशिवाय जीवनात गंमत नाही ह्यावर आमचा ठाम विश्वास असल्याने आम्ही दररोज न चुकता भांडतो मग कारण काहीही असो ते एका गरमागरम चहाच्या कपावर मिटतं. “मी तुला सोडायला येतो आणि आणायला येतो” संघटनेचे अध्यक्ष प्रमुख सुनिल केळकर (बाबा) यांना वाढदिवसाच्या ह्या तुमच्या लाडक्या शेंडेफळाकडून खूप खूप शुभेच्छा…. असेच कायम आनंदी राहा… thank you for everything and love you alot टीप-( diet करायच्या फंदात पडू नका… तुम्ही आम्हाला तुमच्या वाढलेल्या पोटासकट आवडता )”
“लग्नाआधी त्याच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहा”, ‘नागिन’ फेम अभिनेत्रीला आईवडिलांनीच दिला सल्ला; कारण…