• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Team Tamasha Live Pays Tribute To Marathi Cine Industry Nrak

‘तमाशा लाईव्ह’कडून मराठी सिनेसृष्टीला मानाचा मुजरा, सादर केली नव्या युगाची ‘नांदी’

१०० फूट व्यासपीठावर नृत्याचे आद्यदैवत नटराजाला नमन करून 'चित्रपटाची नांदी'ची सुरुवात झाली. या वेळी संजय जाधव, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, आयुषी भावे, मनमीत पेम, अमितराज, पंकज पडघन, क्षितीज पटवर्धन यांनी आपल्या मराठी संस्कृतीला साजेसा असा पारंपरिक वेष परिधान करून सिनेमा घडवणाऱ्या सर्व कलाकारांना, तंत्रज्ञांना, एकंदरच पडद्यामागे मेहनत घेणाऱ्या सर्वांनाच मानाचा मुजरा केला.

  • By Aparna Kad
Updated On: May 02, 2022 | 09:52 AM
‘तमाशा लाईव्ह’कडून मराठी सिनेसृष्टीला मानाचा मुजरा, सादर केली नव्या युगाची ‘नांदी’
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

काही महिन्यांपूर्वी बिग बजेट फिल्म ‘तमाशा लाईव्ह’चे पोस्टर झळकले होते. या पोस्टरमधील सोनाली कुलकर्णीचा जबरदस्त लूक बघून अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती की, हा नक्की कशावर आधारित चित्रपट आहे. मात्र या चित्रपटातील एक एक गोष्टी आता गुलदस्त्याबाहेर येऊ लागल्या असून ‘तमाशा लाईव्ह’मधील ‘चित्रपटाची नांदी’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंतीचे निमित्त साधून हे गाणे भव्यदिव्य स्वरूपात कर्जत येथील एन डी स्टुडिओ येथे प्रदर्शित करण्यात आले. १०० फूट व्यासपीठावर नृत्याचे आद्यदैवत नटराजाला नमन करून ‘चित्रपटाची नांदी’ची सुरुवात झाली. या वेळी संजय जाधव, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, आयुषी भावे, मनमीत पेम, अमितराज, पंकज पडघन, क्षितीज पटवर्धन यांनी आपल्या मराठी संस्कृतीला साजेसा असा पारंपरिक वेष परिधान करून सिनेमा घडवणाऱ्या सर्व कलाकारांना, तंत्रज्ञांना, एकंदरच पडद्यामागे मेहनत घेणाऱ्या सर्वांनाच मानाचा मुजरा केला. मराठी सिनेसृष्टीचा अभिमान वाटावा, असा हा सोहळा होता.

प्रेक्षकांच्या तुफान गर्दीत प्रदर्शित झालेल्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांचे बोल लाभले असून पंकज पडघन यांनी संगीत दिले आहे. सिनेसृष्टीतील वेगवेगळ्या विभागात अमूल्य योगदान देणाऱ्या दिग्गजांचा सन्मान या गाण्याच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या गाण्याची खासियत म्हणजे शौनक अभिषेकी, आनंद भाटे, राहुल देशपांडे आणि अनुराधा कुबेर असे शास्रीय संगीतातील नामवंत गायक यानिमित्ताने एकत्र आले आहेत. त्यामुळे संगीतप्रेमींसाठी हा एक संगीत नजराणाच आहे. तसेच या खास दिनाचे औचित्य साधत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली असून हा चित्रपट २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

प्लॅनेट मराठी आणि माऊली प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली असून सौम्या विळेकर, डॅा. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात सहनिर्माते आहेत. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, पुष्कर जोग, भरत जाधव, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे यांच्या भूमिका आहेत. संजय जाधव यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाची कथा मनीष कदम यांनी लिहिली असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. तर या चित्रपटाला अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत लाभले असून क्षितिज पटवर्धन यांनी ही गाणी शब्दबद्ध केली आहेत. हा एक संगीतमय चित्रपट असून यात सुमारे तीस गाणी आहेत. मराठीत अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे.

‘तमाशा लाईव्ह’बद्दल दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, ” आपल्या मराठी संस्कृतीला लाभलेला भव्य परंपरेचा वारसा जतन करण्याचे काम मराठी सिनेसृष्टी नेहमीच करत आली आहे. याच परंपरेला आधुनिकतेचा साजही वेळोवेळी चढवण्यात आला. आज नितीन देसाई यांच्या स्टुडिओमध्ये एका मोठ्या महोत्सवात ‘चित्रपटाची नांदी’ हे गाणे प्रदर्शित होणे ही आमच्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. त्यासाठी नितीन देसाई यांचे मनापासून आभार मानतो. तसेच या चित्रपटाचे पहिले गाणे इतक्या प्रेक्षकांसमोर प्रदर्शित झाले याचाही विशेष आनंद आहे. मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार यानिमित्ताने एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे शास्त्रीय संगीतातील दिगज्जांचा या गाण्याला आवाज लाभला आहे. ‘तमाशा लाईव्ह’मधून संगीतात काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यामुळे आमचा हा प्रयत्न प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

सोनाली कुलकर्णी ‘तमाशा लाईव्ह’विषयी म्हणते, ” आज इतक्या प्रेक्षकांसमोर ‘चित्रपटाची नांदी’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. पडद्यावर चित्रपट पाहताना जितका सोप्पा वाटतो. तितकाच आव्हानात्मक आणि कठीण तो पडद्यामागे असतो. पडद्यावर कलाकारांचे चेहरे दिसतात. परंतु पडद्यामागच्या कलाकारांची मेहनत कधीच दिसत नाहीत. आज या गाण्याच्या माध्यमातून आम्ही सर्वांचाच सन्मान करत आहोत. ज्यांच्यामुळे चित्रपट घडतो अशा सर्वांना आमच्याकडून मानाचा मुजरा. आजच्या या शुभदिनी चित्रपट प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटाची भव्यता लवकरच प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.”

‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”हे गाणे याच दिनी प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचे खास कारण आहे. ज्यांनी चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली असे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची आज जयंती असून आजच्या दिवशी हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी दुसरा शुभदिवस असूच शकत नाही. या गाण्याच्या माध्यमातून सिनेसृष्टीत आपले योगदान देणाऱ्या प्रत्येकाला सलाम करण्यात आला आहे. हा संगीतमय चित्रपट आहे. संजय जाधवने ज्यावेळी ही संकल्पना मला सांगितली त्या क्षणी ती मला पसंत पडली. एवढ्या मोठ्या उत्सवात आणि एवढ्या प्रेक्षकवर्गासमोर अशा पद्धतीने गाणे प्रदर्शित होण्याची मराठी सिनेसृष्टीतील ही बहुदा पहिली वेळ असावी. ”

Web Title: Team tamasha live pays tribute to marathi cine industry nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 02, 2022 | 09:33 AM

Topics:  

  • sonalee kulkarni

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गोलूमोलू असणे म्हणजे Cuteness! पण असतात गंभीर परिणाम… आपल्या मुलांवर लक्ष द्या

गोलूमोलू असणे म्हणजे Cuteness! पण असतात गंभीर परिणाम… आपल्या मुलांवर लक्ष द्या

Nov 18, 2025 | 09:10 PM
सुदीप फार्माचा ८९५ कोटींचा IPO २१ नोव्हेंबरला उघडणार; किंमतपट्टा ५६३ ते ५९३ निश्चित

सुदीप फार्माचा ८९५ कोटींचा IPO २१ नोव्हेंबरला उघडणार; किंमतपट्टा ५६३ ते ५९३ निश्चित

Nov 18, 2025 | 08:50 PM
सिद्धू मूसेवाला मर्डर केसच्या तपासाला नवी गती; मोस्ट वॉन्टेड गँगस्टर अनमोल बिश्नोईचे भारतात प्रत्यार्पण

सिद्धू मूसेवाला मर्डर केसच्या तपासाला नवी गती; मोस्ट वॉन्टेड गँगस्टर अनमोल बिश्नोईचे भारतात प्रत्यार्पण

Nov 18, 2025 | 08:43 PM
IND vs SA: दारुण पराभवाने भारताच्या उणिवा समोर! पराभवामागे प्रशिक्षक गंभीरचा हट्टीपणा की कर्णधार गिलचा मनमानीपणा? 

IND vs SA: दारुण पराभवाने भारताच्या उणिवा समोर! पराभवामागे प्रशिक्षक गंभीरचा हट्टीपणा की कर्णधार गिलचा मनमानीपणा? 

Nov 18, 2025 | 08:28 PM
अरे काय पहावं लागतंय! देवही लावणार डोक्याला हात, काय आहे भजन Clubbing? Gen-Z मध्ये वाढतेय क्रेझ

अरे काय पहावं लागतंय! देवही लावणार डोक्याला हात, काय आहे भजन Clubbing? Gen-Z मध्ये वाढतेय क्रेझ

Nov 18, 2025 | 08:26 PM
2 साहित्यांपासून घरीच तयार करा डायबिटीजचे औषध, वैद्यांनी दिला सल्ला; फक्त 40 दिवसांतच शुगर राहील नियंत्रणात

2 साहित्यांपासून घरीच तयार करा डायबिटीजचे औषध, वैद्यांनी दिला सल्ला; फक्त 40 दिवसांतच शुगर राहील नियंत्रणात

Nov 18, 2025 | 08:15 PM
Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा

Nov 18, 2025 | 08:08 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.