फोटो सौजन्य - Social Media
दक्षिण भारतातील सुपरस्टार अभिनेत्री समंथा रूथ प्रभू गेल्या काही वर्षांमध्ये फार चर्चेत होती. या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. फरक इतकेच आहे कि, चर्चेचा विषय बदलला आहे. सोशल मीडियावर गोष्टी व्हायरल होणे फार सामान्य गोष्ट आहे. भारतीय सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आपल्या खजी आयुष्याबद्दल त्यांच्या चाहत्यांना सांगत असतात.
काही कलाकारांना खाजगी आयुष्याबद्दल खुलासे करायला मुळीच आवडता नाही. परंतु, आताचे जग हे सोशल मीडियाचे जग आहे. यापासून कोणी वाचू शकत नाही, हे प्रत्येकवेळी सोशल मीडिया सिद्ध करत असतो. अभिनेते व अभिनेत्री खुलासे करो वा ना करो, सोशल मीडिया त्या गोष्टी बरोबर शोधून काढतो. अशा गोष्टी इंस्टाग्राम तसेच इतर सोशल मीडिया साईटवर लवकर प्रसिद्ध होतात. या गोष्टींना व्हायरल होण्यासाठी जास्त वेळ नाही लागत.
अशात दक्षिण भारताची ग्लॅमर्स क्वीन समंथा रूथ प्रभू विषयी एक बातमी फार चर्चेत आहे. समंथा जितकी हुशार अभिनयात आहे तितकीच हुशारी तिने शाळेतील अभ्यासात पण दाखवली होती. समंथाची गुणपत्रिका फार व्हायरल होत आहे. या मार्कशीटमध्ये समंथा अभ्यासामध्ये किती हुशार होती? या प्रश्नाचे उत्तर आहे. ही मार्कशीट समंथाच्या दहावीची आहे. या मार्कशीटवर तिच्या चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद येत आहे. समंथा रुथ प्रभूला हायस्कूलमध्ये खूप चांगले गुण मिळाले होते. तिला इंग्रजी भाग १ आणि इंग्रजी भाग २ मध्ये अनुक्रमे १०० पैकी ९० आणि ७४ गुण मिळाले आहेत. तामिळ/हिंदी-1 आणि तामिळ/हिंदी-२ मध्ये अनुक्रमे १०० पैकी ८३ आणि ८८ गुण मिळाले होते. गणित भाग १ मध्ये १०० पैकी १०० तर गणित भाग २ मध्ये १०० पैकी ९९ गुण मिळाले होते. इतिहासात १०० पैकी ९१, भूगोलमध्ये १०० पैकी ८३ गुण.
एकंदरीत, अभिनेत्रीला एकूण १००० पैकी ८८७ गुण मिळाले आहेत. या मार्कशीटमध्ये समंथाच्या शिक्षकांनी तिचे कौतुक केले होते. तिथे लिहले आहे कि,” तिने खूप उत्तम कामगिरी केली आहे. ती या शाळेची असेट आहे.” या शब्दांनी तिच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली आहे. कमेंट्समध्ये तिच्या चाहत्यांनी देखील कौतुकाची थाप दिली आहे.






