टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस 17 सध्या प्रचंड चर्चेत आहे. या लोकप्रिय शो चा ग्रँड फिनाले कालच पार पडला. या शो चा होस्ट सुपरस्टार सलमान खानाने मुनावर फारुकीला विजेता घोषित केले आहे. स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारुकीचा बिग बॉस 17 चा विजय त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाही. बिग बॉस 17 च्या ट्रॉफीसह, मुनावरने 50 लाख रुपये आणि एक नवीन कार देखील त्याला देण्यात आली आहे. यजमान सलमान खानने मुनावरला विजेता घोषित केल्यानंतर लगेचच, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुंबईतील रॅपर-कॉमेडियनच्या मूळ भागात, डोंगरी येथे झालेल्या सेलिब्रेशनच्या फोटो आणि व्हिडिओंनी पूर आला.
मुनावरच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण साजरा करण्यासाठी त्याचे शेकडो चाहते एकत्र आले. आता व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये मुनावरचे चाहते त्याच्या मुलासोबत सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. त्याचबरोबर मुनावरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सांगितले होते की तो आज 3 वाजता डोंगरीला ट्रॉफी घेऊन येणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी अलोट गर्दी केली आहे आणि या संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.