फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस 18 : बिग बॉस 18 मध्ये मागील आठवड्यामध्ये तीन सदस्यांना घराबाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर आता घरामध्ये ११ सदस्य शिल्लक आहेत. यामध्ये या आठवड्यात सात सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. शिल्पा शिरोडकर, करणवीर मेहरा, श्रुतिका अर्जुन आणि चुम दारंग हे सदस्य या आठवड्यात सुरक्षित आहेत. घराची नवी टाइम गॉड चुम दारंगला विशेष पॉवर दिल्यानंतर तीन नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी चाहत पांडेला वाचवले आहे. आता आणखी एका सदस्याला घरातून बाहेर काढण्यात आले आहे. त्यानंतर घरात फक्त १० सदस्य उरले आहेत जे पुढे खेळ सुरू राहणार आहे. साहजिकच या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या सदस्यांची यादी खूपच मनोरंजक होती.
टाइम गॉड श्रुतिका अर्जुनने करणवीर मेहरा, चुम दरंग आणि शिल्पा शिरोडकर यांना नामांकनापासून सुरक्षित ठेवले होते, तर विवियन डिसेनासह तिचा संपूर्ण गट म्हणजेच सारा खान, कशिश कपूर, इशा सिंह, रजत दलाल, विवियन डिसेना आणि अविनाश मिश्रा हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. या आठवड्यात चुम घराची नवीन टाइम गॉड बनली आणि तिने चाहत पांडेला सुरक्षित केले.
Bigg Boss 18 : टाइम गॉड चुम दारंगला मिळाली स्पेशल पॉवर, या स्पर्धकाला नॉमिनेशनमधून वाचवलं
या आठवड्यात बिग बॉस १८ मधून बाहेर काढण्यात आलेल्या स्पर्धकांमध्ये सारा खान, कशिश कपूर आणि ईशा सिंग यांचाही समावेश होता. ईशा सिंग आणि सारा खान या स्पर्धकांपैकी एक मानल्या जात होत्या ज्यांना बाहेर काढण्याची सर्वाधिक शक्यता होती. या वीकेंडच्या वॉर शोमध्ये ज्या स्पर्धकाचा प्रवास संपला आहे ती सारा अरफीन खान आहे. बिग बॉस १८ फॅन पेज ‘लाइव्ह फीड अपडेट’नुसार, सारा अरफीन खान या आठवड्यात बाहेर पडली आहे.
Breaking #SaraArfeenKhan ELIMINATED from the house
— The Khabri (@TheKhabriTweets) December 27, 2024
सोशल मीडियावर आता एक नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये सलमान खान कशिश कपूरला प्रश्न करताना दिसत आहे. यामध्ये सलमान सुरुवातीला म्हणतो की, तू जेव्हा फ्लर्ट करतेस तेव्हा ती फ्लर्टींग आणि जेव्हा समोरचा फ्लेवर म्हणाला की, तो अँगल होतो. यावर कशिश म्हणते की, ही आली होती माझ्यासमोर अँगल बनवायला या वाक्याचा मला त्रास होत होता. यावर सलमान म्हणतो की, अँगल बनवायला तर तू गेली होती. यावर कशिश म्हणते की, नाही सर मी हे नाही स्वीकारत आहे, हे नाटक तू आधीपासून करत आहेस. यावर कशिश म्हणते की, मला एक सेकंड द्या मला बोलायला. यावर सलमान म्हणतो अजिबात नाही आणि हे माझ्यासोबत अजिबात करू नको.
Kashish Kapoor Vs Salman: sk was so close to losing his temper 💀😭 pic.twitter.com/xU7lammaGX
— 𝐕. (@whenvsayshiiii) December 27, 2024