Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तुंबाडची मंजुळा’मध्ये सई ताम्हणकरचा नवा अवतार; नव्या दिग्दर्शकासोबत कामाचा अनुभव शेअर करत म्हणाली…

सई लवकरच ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटात एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक विविध कोरगांवकर यांनी केले असून, त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सईने शेअर केला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 03, 2026 | 12:19 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

क्रॉसओव्हर क्वीन  सई ताम्हणकरम्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री आपल्या वेगळ्या आणि दर्जेदार भूमिकांमुळे कायमच चर्चेत असते. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत तिने आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली असून, विविध प्रकारच्या आणि आव्हानात्मक भूमिका साकारत तिने आपली ओळख अधिक मजबूत केली आहे.नावीन्यपूर्ण भूमिका आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सई ताम्हणकरने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. प्रत्येक भूमिकेत वेगळेपण जपत तिने अनेक लक्षवेधी पात्रांना न्याय दिला आहे.

आता सई लवकरच ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटात एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक विविध कोरगांवकर यांनी केले असून, त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सईने शेअर केला आहे.

तिने सांगितले की, विविध पद्धतींच्या कार्यपद्धती आणि नव्या वातावरणात काम करण्याचा अनुभव नेहमीच समृद्ध करणारा असतो. नव्या दिग्दर्शकांसोबत काम केल्याने कलाकाराला नवीन दृष्टिकोन आणि शिकण्याची संधी मिळते, असेही तिने नमूद केले.

एकूणच ‘तुंबाडची मंजुळा’ आणि सई ताम्हणकरचा नवा अवतार प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारा ठरणार आहे. नवोदित दिग्दर्शक आणि कलाकारांसोबत काम करतानाही सईने मराठी आणि बॉलिवूडमध्ये सातत्याने दमदार प्रोजेक्ट्स केले आहेत.‘मटका किंग’ या बहुचर्चित प्रोजेक्टमध्ये तिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासोबत काम केले आहे. तसेच ‘डब्बा कार्टेल’ (हितेश भाटिया), ‘अग्नी’ (राहुल ढोलकिया), ‘ग्राउंड झीरो’ (तेजस प्रभा विजय देओस्कर) आणि ‘मिमी’ (लक्ष्मण उतेकर) यांसारख्या नामांकित दिग्दर्शकांसोबतही तिने उल्लेखनीय काम केले आहे.

बॉलिवूड आणि मराठीतील अनेक बड्या व प्रतिष्ठित दिग्दर्शकांसोबत काम केल्यानंतर सई आता ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटाचा भाग होत आहे. या चित्रपटात ती एका नव्या दिग्दर्शकासोबत काम करत असून, नवीन टीमसोबत काम करण्याबाबतचा तिचा अनुभवही तिने अधोरेखित केला आहे.

नव्या दिग्दर्शकांसोबत काम करताना कलाकाराला नवीन दृष्टिकोन, ताज्या कल्पना आणि वेगळ्या पद्धतींचा अनुभव मिळतो, असे सईचे मत आहे.नवीन व्यक्तीसोबत आणि तिच्या पहिल्या प्रकल्पासाठी काम करणं हे नेहमीच खास असतं, अशी भावना अभिनेत्री सई ताम्हणकरने व्यक्त केली आहे. इंडस्ट्रीत स्वतःची सुरुवात करताना अनेक दिग्दर्शक आणि सहकलाकारांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाची जाणीव या अनुभवातून अधिक ठळकपणे होत असल्याचं तिने सांगितले.

सई म्हणाली की, या इंडस्ट्रीत सुरुवातीच्या काळात मिळालेला विश्वास आणि पाठिंबा हा खूप महत्त्वाचा होता. त्यामुळेच आता जेव्हा त्या कोणाच्या पहिल्या चित्रपटाचा किंवा नव्या प्रवासाचा भाग होतात, तेव्हा ती भावना अधिक अर्थपूर्ण वाटते. ही ऊर्जा आणि प्रेरणा देणारी प्रक्रिया असल्याचं त्यांनी नमूद केलं.

लाजिरवाणे! महिलेवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर हसणं प्रणीत मोरेला पडलं महागात; नेटकऱ्यांनी घेतला समाचार, अखेर कॉमेडियनने जोडले हात

वेगवेगळ्या कार्यपद्धती असलेल्या दिग्दर्शकांसोबत आणि विविध वातावरणात काम करणं आपल्याला सतत समृद्ध करतं, असंही सई यांनी स्पष्ट केलं. कोणत्याही नव्या प्रोजेक्टचा पहिला टप्पा हा त्या टीमसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्याचा भाग होणं ही विशेष जबाबदारी वाटते, असं त्या म्हणाल्या.

नव्या आवाजांना आणि नव्या प्रतिभेला पाठिंबा देण्यात वेगळं समाधान मिळतं, अशी भावना व्यक्त करत सईने नवोदित कलाकार आणि दिग्दर्शकांना प्रोत्साहन देण्याचं महत्त्व अधोरेखित केलं.एकूणच, सई ताम्हणकरच्या कामाचं सातत्य आणि तिने साकारलेल्या लक्षवेधी भूमिका यामुळे त्या नेहमीच चर्चेत राहिल्या असून आगामी काळातही ती अनेक दर्जेदार प्रोजेक्ट्समध्ये दिसणार असल्याचं कळतं.

हरवलेली मुलगी, मृतदेह अन्.., मनाचा थरकाप उडवणारा ‘दृश्य अदृश्य’चा अधिकृत ट्रेलर रिलीज, चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Web Title: Tumbadchi manjula shows sai tamhankar in a new avatar while sharing her experience of working with a new director she said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • Sai Tamhankar

संबंधित बातम्या

Ketaki Kulkarni: ‘कठीण काळात स्वतःवरचा विश्वासच माझी शक्ती ठरला’; ‘कमळी’ फेम केतकी कुलकर्णीचा प्रेरणादायी खुलासा
1

Ketaki Kulkarni: ‘कठीण काळात स्वतःवरचा विश्वासच माझी शक्ती ठरला’; ‘कमळी’ फेम केतकी कुलकर्णीचा प्रेरणादायी खुलासा

Chinmayi More: ‘धाकट्या सुनबाई’ फेम चिन्मयी मोरेने उलगडला यशाचा प्रवास; आईविषयी बोलताना झाली भावुक
2

Chinmayi More: ‘धाकट्या सुनबाई’ फेम चिन्मयी मोरेने उलगडला यशाचा प्रवास; आईविषयी बोलताना झाली भावुक

Janhavi Killekar: जान्हवी किल्लेकरने जिंकली मनं! वाढदिवसाची पार्टी रद्द करून SMAग्रस्त चिमुकली गार्गीच्या उपचारांसाठी केली मदत
3

Janhavi Killekar: जान्हवी किल्लेकरने जिंकली मनं! वाढदिवसाची पार्टी रद्द करून SMAग्रस्त चिमुकली गार्गीच्या उपचारांसाठी केली मदत

Prapti Redkar: स्त्रीशक्ती म्हणजे नेमकं काय? प्राप्ती रेडकरने सांगितला स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा अर्थ
4

Prapti Redkar: स्त्रीशक्ती म्हणजे नेमकं काय? प्राप्ती रेडकरने सांगितला स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा अर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.