Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tamannah सोबत ब्रेकअपनंतर Vijay Varma झाला होता उद्धवस्त! सिनेसृष्टीपासून राहिला लांब; म्हणाला, ‘लोक शिव्या देत…’

बॉलिवूडमधील सर्वात लाडक्या जोड्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांचे गेल्या वर्षी ब्रेकअप झाले. हे दोघे जवळपास दोन वर्षे एकमेकांच्या नात्यात होते. मात्र, या ब्रेकअपचा विजयवर मोठा परिणाम झाला

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 14, 2026 | 07:09 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांचे गेल्या वर्षी ब्रेकअप
  • ब्रेकअपनंतर सहन करावे लागले टोमणे
  • बाँड पुन्हा एकदा मजबुत करण्यावर लक्ष
Vijay Varma Received Hate : बॉलिवूडमधील सर्वात लाडक्या जोड्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांचे गेल्या वर्षी ब्रेकअप झाले. हे दोघे जवळपास दोन वर्षे एकमेकांच्या नात्यात होते. मात्र, या ब्रेकअपचा विजयवर मोठा परिणाम झाला. अलीकडेच, या अभिनेत्याने खुलासा केला आहे. तो काळ त्याच्यासाठी कसा होता आणि त्याने कशाप्रकारे जाणीवपूर्वक १४ महिने प्रसिद्धीझोतापासून दूर राहणे पसंत केलं; जेणेकरून लोकांचं लक्ष त्याच्या वैयक्तिक आयुष्याऐवजी पुन्हा एकदा त्याच्या कामाकडे केंद्रित होईल.

तीव्र विरहापासून भाषिक आवडीपर्यंत: ‘तो ती आणि फुजी’मध्‍ये मृण्‍मयी गोडबोलेचा हृदयस्‍पर्शी प्रवास

ब्रेकअपनंतर सहन करावे लागले टोमणे

तमन्नासोबत ब्रेकअपनंतर विजयची काय परिस्थिती होती हे विजयने स्पष्ट केलं. विजय म्हणाला की, इतरांच्या हस्तक्षेपामुळे त्याला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आणि हे सर्व अशा वेळी घडले, जेव्हा त्याने आपल्या नातेसंबंधाबद्दल कधीच उघडपणे भाष्य केले नव्हते. त्याने आपल्या प्रेमजीवनाबद्दल किंवा ब्रेकअपबद्दल कशाबद्दलच चर्चा केली नव्हती; तरीही, लोकांनी मात्र स्वतःहूनच या प्रकरणाला अत्यंत सनसनाटी स्वरूप देण्याचा प्रयत्न केला.

या बदलांशी जुळवून घेणे कठीण

यासर्वाबाबत News18 शी बोलताना विजय म्हणाला, “पूर्वीच्या काळी, जर एखाद्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी दुसऱ्याबद्दल वाईट बोललं, तर ते चुकीचे मानले जात असे. पण आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला कोणीही काही बोलत नाही; उलट, ज्या व्यक्तीला शिवीगाळ केली जात आहे, त्याच व्यक्तीच्या विरोधात इतर लोक आवाज उठवू लागतात.”
विजयने असेही उघड केले की, गेल्या वर्षभरात त्याच्याबद्दल प्रचंड नकारात्मक गोष्टी आणि खोट्या बातम्या पसरल्या आहेत. तो म्हणाला, “जग अत्यंत वेगाने बदलत आहे आणि या बदलांशी जुळवून घेणे मला कठीण जात आहे. लोकांच्या संवाद साधण्याच्या आणि प्रतिक्रिया व्यक्त करण्याच्या पद्धती आता अत्यंत वैयक्तिक आणि बोचऱ्या झाल्या आहेत. अनेकदा गोष्टी खोट्याच रचल्या जातात आणि लिहिल्या जातात अशा कथा ज्यामध्ये सत्याचा काहीही भाग नसतो.”

कामातून घेतलेल्या विश्रांतीमुळे कुटुंबाच्या अधिक जवळ

विजयने हे मान्य केले की, अशा महत्त्वाच्या टप्प्यावर कामातून विश्रांती घेण्याचा एक फायदा असा झाला की, यामुळे त्याला आपल्या कुटुंबाच्या अधिक जवळ जाता आले. विजय म्हणाला, “मला मनापासून असे वाटले की, मला त्या सर्व गोष्टींचा भाग व्हायचे नाहीये. त्यामुळे, मला जे करायला मनापासून आवडते म्हणजेच विविध भूमिका साकारणे आणि कथा सांगणे नेमके तेच मी करायला सुरुवात केली. या प्रक्रियेतच, मला माझ्या कुटुंबाच्याही अधिक जवळ जाता आले. मी नुकतेच एक मोठे घर विकत घेतले आहे आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांनी शक्य तितक्या वारंवार माझ्याकडे भेट द्यावी, यासाठी मी जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतो.”

बाँड पुन्हा एकदा मजबुत करण्यावर लक्ष

विजय सांगतो की, सध्या त्याची आई, बहीण आणि भाचा त्याच्यासोबत राहत आहेत आणि तो त्यांच्या सहवासात बराच वेळ घालवत आहे. याव्यतिरिक्त, आता त्याने आपल्या मित्रांसाठीही वेळ काढायला सुरुवात केली आहे. तो म्हणतो, “गेल्या काही वर्षांत, मी माझ्या कामात इतका गढून गेलो होतो की, मला माझ्या मित्रांसाठी अजिबातच वेळ मिळत नव्हता. आता मात्र, जेव्हा जेव्हा मला समजते की माझ्याकडे थोडा मोकळा वेळ आहे, तेव्हा मी लगेचच त्यांना भेटण्याचं प्लॉनिंग करतो. सध्या मी माझे बाँड पुन्हा एकदा मजबुत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.”
व्यावसायिक आघाडीवर बोलायचे तर, विजय लवकरच त्याच्या आगामी चित्रपट ‘मटका किंग’मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sushant Singh Rajput’s च्या बहिणीने घेतली नवी प्रॉपर्टी; चावी हातात येताच घडली ‘विचित्र’ गोष्ट

Web Title: Vijay varma received hate after breaking up with tamannah bhatia took long break read full story marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 07:09 PM

Topics:  

  • Bollywood
  • bollywood Flim
  • bollywood movies
  • Bollywood News
  • Bollywood News Update
  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.