चित्रपटसृष्टीतील निर्माती पल्लवी जोशी आणि निर्माते विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी नेहमीच संशोधनावर आधारित चित्रपट बनवण्यावर भर दिला आहे. त्यांचा ‘द ताश्कंद फाईल्स’ हा चित्रपट अडीच तासांच्या तार्किक चर्चेवर आधारित असून या चित्रपटाच्या संशोधनासाठी बराच वेळ देऊन त्यांनी मेहनत केली. त्याचप्रमाणे, विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सत्य परिस्थितीवर आधारित असून, यासाठी निर्मात्यांनी एक वर्ष अभ्यास आणि संशोधन केले होते. आता ‘द व्हॅक्सिन वॉर’ (The Vaccine War)हा विवेक अग्निहोत्रींचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने त्यांनी सोशल मीडियावर आपले विचार मांडले आहेत.
Our team at @i_ambuddha is researching on how India fought COVID for almost a year+. We discovered details which can make any human proud of our scientists & leadership. I fail to understand why our media doesn’t do such research & make youth proud of Bharat? Isn’t it their job? — Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) November 21, 2022
आपला देश गेल्या दोन वर्ष आघातातून गेला आहे. जग एक फॉर्म्युला बनवण्यासाठी धडपडत करत असतानाच, लस बनवण्यात यश आलेल्या काही देशांपैकी एक म्हणून भारत उदयास आला आहे. लस तयार करण्यासाठी अनेक भारतीय शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी आपले दिवस रात्र एक केली. जिथे लोक कोरोनावरील विजयाचा आनंद साजरा करण्यात व्यस्त होते तिथे काही एजन्सी, पक्ष आणि मीडिया हाऊसेस सतत या विजयाची बदनामी करण्याच्या दिशेने वाटचाल करत होते. याबाबत विवेक अग्निहोत्री म्हणाले,“जेव्हा आपला देश महामारीच्या काळात संघर्ष करत होता तेव्हा जे काही चुकीचे होते त्या प्रत्येक गोष्टीचे संशोधन करण्यासाठी आम्ही खरोखर कठोर परिश्रम करत आहोत. आता आम्ही एका वर्षाच्या संशोधनानंतर तयार आहोत. एकूण ५२ लोक ज्यांनी रात्रंदिवस एक करून ते कार्यान्वित केले आणि याला ८००० पानांत समअप केले.”
[read_also content=”पंतप्रधान कार्यालय प्रगती पोर्टलच्या माध्यमातून मुंबई ऊर्जा मार्गावर (MUML) ठेवणार देखरेख https://www.navarashtra.com/business/the-prime-ministers-office-will-monitor-the-mumbai-energy-line-muml-through-the-pragati-portal-nrvb-347712/”]
सोशल मीडियावर विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले, “आमची टीम @i_ambuddha जवळपास एक वर्षाहून अधिक काळ भारताने कोविडशी कसा लढा दिला यावर संशोधन करत आहे. आम्हाला असे तपशील मिळाले आहेत ज्याने कोणत्याही व्यक्तीला आपले शास्त्रज्ञ आणि त्यांच्या नेतृत्वाचा अभिमान वाटेल. मला समजत नाही की आपला मीडिया असे संशोधन का करत नाही जेणेकरून तरुणांना भारताचा अभिमान वाटेल? हे त्यांचे काम नाही का?”






